Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली. 

Updated: Jan 12, 2023, 08:16 AM IST
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट title=

Pankaja Munde met Dhananjay Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली. आपले चुलतबंधू असलेल्या धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली. 4 जानेवारीला परळीला झालेल्या कार अपघातात धनंजय मुंडे जखमी झाले. त्यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, आज धनंजय यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आले होते. त्यांची तब्येत बरी आहे. मी बहीण आहे आणि मागे देखील धनंजय मुंडे ऍडमिट होते, तेव्हा मी भेटायला आली होती. मी तर बहीण आहे आणि सर्वच राजकीय नेतेमंडळी एकमेकांना भेटतात ही राजकीय संस्कृती आहे. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा शासकीय दौरा आहे. त्यामुळे मी यामध्ये सहभागी होणार नाही, असेही स्पष्ट केले.

धनंजय यांना आणखी काही दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी राहावे लागणार आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल भाजप नेत्या आणि धनंजय यांच्या बहीण पंकजा मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्या.

 धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांच्या कारला मंगळवारी रात्री 12.30 वाजता अपघात झाला. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम आणि ग्रामस्थांच्या भेटी घेऊन ते परळीकडे परत असताना त्यांच्या गाडीला (Dhananjay Munde Accident) अपघात झाला.  कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात परळी येथे झाला. 

प्राथमिक उपचारानंतर धनंजय मुंडे यांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे. त्यांना एअर ॲम्बुलन्सने धनंजय मुंडे यांना मुंबईत उपचारासाठी आले. आपल्या कारला अपघात झाल्याची माहिती ट्वीट करुन धनंजय मुंडे यांनी दिली आहे. माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी ट्वीट करताना केले. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन देखील धनंजय मुंडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून केलं होते.