'अफवा पसरवू नका, पंकजा भाजपा सोडणार नाहीत' - चंद्रकांत पाटील

पंकजा मुंडे भाजपा सोडणार नाहीत, त्या भाजपाशिवाय कुठेही जाणार नाहीत, असा आशावाद भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Updated: Dec 2, 2019, 02:37 PM IST
'अफवा पसरवू नका, पंकजा भाजपा सोडणार नाहीत' - चंद्रकांत पाटील title=

मुंबई : पंकजा मुंडे भाजपा सोडणार नाहीत, त्या भाजपाशिवाय कुठेही जाणार नाहीत, असा आशावाद भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पराभवानंतर नाराज असलेल्या पंकजा मुंडे म्हणजे पक्ष सोडणार आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. पंकजा मुंडे या पक्ष सोडणार आहेत, या अफवा थांबवा असं आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 

तसेच विनोद तावडे यांनी देखील पंकजा मुंडे भाजपा सोडणार नसल्याचं म्हटलं आहे. पक्षाला मजबूत करण्यात पंकजा मुंडे यांचं मोठं योगदान असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे या भाजपा सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हे जरी भाजपाच्या नेत्यांनी फेटाळून लावलं असलं, तरी दुसरीकडे पंकजा मुंडे या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

तसेच पंकजा मुंडे या काय करतील, भाजपा सोडतील किंवा नाही, हे 12 डिसेंबरला कळू शकतं असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

पंकजा मुंडे यांनी एका फेसबूक पोस्टमध्ये आता वेगळी वाट निवडावी लागेल, आणि 12 डिसेंबर रोजी पुढील निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे, यानंतर पंकजा मुंडे नेमकी वेगळी वाट निवडणार म्हणजे काय करणार या चर्चेला उधाण आलं आहे.