आमच्या वाट्याचे ऑक्सिजन आम्हालाच द्या, मुंबई पालिकेची विनंती

मुंबई पालिकेची विनंती 

Updated: May 3, 2021, 12:57 PM IST
आमच्या वाट्याचे ऑक्सिजन आम्हालाच द्या, मुंबई पालिकेची विनंती  title=

मुंबई : मुंबईसह राज्यभरात लसींच्या अभावी लसीकरण सुरु करण्यात उशीर होतोय. कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवणे तसेच 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करणे हे राज्यासमोरचे प्रमुख आव्हान आहे. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा हा यक्ष प्रश्न बनलाय. या पार्श्वभुमीवर आमच्या वाट्याचे ऑक्सिजन आम्हालाच द्या अशी विनंती मुंबई पालिकेने केली आहे. 

मुंबई महापालिकेच्या वाट्याचा ऑक्सिजन ठाणे आणि नवी मुंबई पालिकेला दिल्याने मुंबई महापालिकेला ही विनंती करण्याची वेळ आलीय. अतिरीक्त आयुक्त पी. वेलारासु यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तसेच कोकण विभागीय आयुक्त यांना यासंदर्भात पत्र लिहिलंय. 

प्राणवायूचा देशात सर्वत्र तुटवडा जाणवत असताना प्रत्येक राज्य आपल्याला अधिकाधिक पुरवठा व्हावा यासाठी सध्या झगडत आहे. या परिस्थितीत पुरवठादार कंपन्यांकडून मुंबई शहरासाठी वितरित झालेला प्राणवायू ठाणे आणि नवी मुंबई पालिकेने परस्पर आपल्याकडील रुग्णांसाठी वळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह

मुंबर्ईच्या वाट्याचा तब्बल 144 मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायू पाच दिवसांमध्ये शहरात पोहोचू शकला नाही. गरज आणि रुग्णसंख्येनुसार प्रत्येक शहरासाठी प्राणवायूचा हिस्सा निश्चित करण्यात आला आहे.

त्यानुसार मुंबईसाठी 234 मेट्रिक टन प्राणवायू उपलब्ध करण्यात येतो. सतरामदास गॅसेस कंपनीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला मिळतो.

पालिका हा साठा आपली रुग्णालये आणि जम्बो करोना केंद्रांना पुरवते. हीच कंपनी मुंबईप्रमाणेच ठाणे आणि नवी मुंबईला प्राणवायूचा पुरवठा करते.

पुरवठादार कंपनीकडे प्राणवायूचा एक टँकर आला होता. तो नवी मुंबई आणि ठाण्यासाठी असल्याचा उल्लेख उत्पादक कंपनीने पाठविलेल्या कागदपत्रांवर होता.