मुंबई : जर तुम्ही नवीन वर्षासाठी बाहेर जाण्याचे प्लॅन आखत असाल तर मुंबईत राहूनही तुम्ही खुप छान पद्धतीने ऐन्जॉय करु शकता. हॉटेल्स ते क्लब्स आणि दुसरीही अन्य लोकशन यावेळी तुमच्या स्वागताला सज्ज आहेत.
वर्ष संपतंय आणि २०१८ च्या स्वागताचे वेगवेगळे प्लॅन आखले जातायत. मुंबईच्या देखण्या लोकेशन्सवर एकतीस डिसेंबर साजरा करणार असाल तर अनेक पर्याय तुमची वाट पाहत आहेत.
बजेटच्या हिशेबाने जर तुम्ही शोधणार असाल तर वेस्टीनचा पर्याय आपणासाठी योग्य आहे. ११० शेफनी मिळून १५० डिशेजच्या मेनुची मेजवानी तयार ठेवलीय... तर फोर सिझनमध्ये १३,००० चा कपल एन्ट्री पास आहे.
आणि याहूनही थोडं महागड हवं असल्यास पंधरा हजारात शेफच्या सिग्नेचर मेन्यूसह डायनिंगचा विकल्प आहे....
आणि याहूनही थोडं शानदार हवं असल्यास ताजच्या 'कासाब्लंका'मध्ये सुपर लक्झरी डिनरचा पर्याय आहे. दोन लाख रुपयात प्रायव्हेट डायनिंगचा आपण आनंद घेऊ शकता.
आणि जर खरच तुम्हाला पर्याय आठवत नसेल तर 'बुक माय शो'ची मदत घेऊ शकाल. 'बुक माय शो'ने मुंबईच्या दोनशे ते अडीजशे इव्हेंटची यादी केली आहे. जिथे जाऊन आपण नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करु शकाल...
- एस्सेल वर्ल्ड आणि वॉटर किंगडममध्ये २००० रुपयाच्या एन्ट्री पासवर आपण नवीन वर्ष सेलिब्रेट करु शकाल
- जर तुमचा पार्टीचा मूड नसेल तर स्टॅन्डअप कॉमेडी शोचाही ऑप्शन तुमच्यासाठी खुला आहे. ज्याची एन्ट्री फी ५०० ते हजार रुपये आहे
- डिजे नाईट एन्जॉय करणार असाल तर वेगवेगळ्या बजेटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत
सेलिब्रेशनसोबत हॉस्पिटीलेटी सेक्टरला न्यु इयर ला आर्थिक उलाढाली फार मोठी संधी असते. मागच्या वर्षी नोटबंदीमुऴे हॉटेल क्षेत्रावर मंदीची झळ होती. पण यंदा मात्र फार मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.