नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण....

सरकारची दुटप्पी भूमिका असू नये, भूमिका एक असली पाहिजे - फडणवीस 

Updated: Aug 24, 2021, 01:29 PM IST
नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण....   title=

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्याने वासरू मारलं तर आपण गाय मारू अशा प्रकार सरकार वागत असेल तर भाजप राणे यांच्या 'त्या' वक्तव्याच्या पाठीशी नसेल. पण नारायण राव राणेंच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आहे हे सांगतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

नारायण राणेंच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही. मात्र संपूर्ण भारतीय जनता पक्ष नारायण राणे यांच्या पाठीशी आहे. आम्ही राडेबाज नाही. आम्ही राडा करत नाही. मात्र भाजप कार्यालयांवर हल्ला झाला तर आंदोलन करू. कायद्याचं राज्य असलं पाहिजे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे 

- मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात राणे यांनी जे विधान केलं त्यातून मोठा वाद निर्माण झाला
- बोलण्याच्या ओघात राणे बोलले असावे, असं बोलावं असं त्यांच्या मनात असेल असं वाटतं नाही
- मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती बाबत बोलताना संयम बाळगणं गरजेचं आहे असं मत आहे
- मुख्यमंत्री स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी विसरतात यामुळे एखाद्याला संताप येऊ शकतो, पण वेगळ्या प्रकारे निषेध व्यक्त करता येऊ शकतो
 - मात्र सरकार आता हे वागत आहे समर्थनाथ नाही
- भाजपा राणे यांच्या विधानाला पाठींबा नाही मात्र राणे यांच्या पाठीशी असेल*
- कायद्याच्या भाषेत कॉबगीझेबल गुन्हा नाही
- गुन्ह्याला कायद्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न
- पोलिसांचा गैरवापर चांगला नाही.