स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळच्या कामातील महत्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. विमानतळाच्या जवळून वाहणाऱ्या उलवा नदीचे पात्र वळवण्यात आलं आहे. सिडकोनं हे काम दोन वर्षात पूर्ण केलं. यासाठी डोंगर तोडून पात्र वळवण्यात आलं. डोंगर तोडण्याचं मोठं आव्हान सिडको समोर होतं. तरीही दोन वर्षात नदीचं पात्र वळवून ते खाडीत सोडण्यात आलं आहे.
साडेतीन किलोमीटरची संरक्षक भिंत बांधण्यात आली असून 'ग्याबीयन' पद्धतीनं याची बांधणी करण्यात आली आहे. यासाठी पुण्यातील सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर या संस्थेच्या मार्गदर्शनानुसार उल्वा नदीचे पात्र वळवण्यात आलं.