मुंबई : मुंबईत कोरोनामुळे आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वरळीत खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. वरळीतील 86 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मुंबईतील कोरोना मृतांची संख्या आता 12वर पोहचली आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 335वर पोहचला आहे.
मुंबई | वरळीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू
वरळीतील 86 जण क्वारंटाईन
मुंबईतील मृतांचा आकडा 12वरhttps://t.co/HOK58cBO5u#Coronaindia #MumbaiLockdown— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 1, 2020
मंगळवारी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारवीमध्ये एक कोरोनाग्रस्त आढळला आहे. धारावीमध्ये 56 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर त्याच्या घरातील 8 ते 10 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
राज्यात 335 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 41 जणांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आतापर्यंत राज्यात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
4 more deaths, due to #Coronavirus, have taken place in Maharashtra today taking the total death toll in the state to 16. The total number of positive cases in the state has risen to 335, including 41 people who have been discharged: Maharashtra Health Department
— ANI (@ANI) April 1, 2020
गेल्या २४ तासांत देशामध्ये ३८६ कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे देशात कोरोनाग्रस्तांची संख्या १६३७ वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.