यंदाही पांडवकड्याच्या धबधब्यावर पर्यटकांना बंदी!

पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर खारघर शहरातील प्रसिद्ध पांडवकडा धबधबा धो धो वाहण्यास सुरुवात झाली आहे. मात्र वन विभागाने यंदाही सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेशबंदी घातलीय. 

Updated: Jun 27, 2017, 04:00 PM IST
यंदाही पांडवकड्याच्या धबधब्यावर पर्यटकांना बंदी! title=

मुंबई : पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर खारघर शहरातील प्रसिद्ध पांडवकडा धबधबा धो धो वाहण्यास सुरुवात झाली आहे. मात्र वन विभागाने यंदाही सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेशबंदी घातलीय. 

पर्यटकांची सुरक्षा धोक्यात येऊ नये, म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. याकरिता सुरक्षा भिंत बांधण्याचे काम वनविभागाने सुरू केलंय.

यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला असला तरी आजवर शेकडो पर्यटकांच्या जीवावर बेतलेल्या या धबधब्यावर वन विभागाने घातलेली बंदी योग्यच असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केलीय. 

सुमारे १०० पेक्षा जास्त फूट उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्यात मनमुराद भिजण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही. या ठिकाणी मुंबई, उपनगरांसह, ठाणे, कल्याण, भिवंडी, या शहरांमधून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.

मात्र, पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शासनाने योग्य त्या उपाययोजना केल्यास हा धबधबा एक सुंदर पर्यटनस्थळ होऊ शकते. यासाठी शासनाने तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात आली आहे.