Mumbai : मुंबईकरांना 'झटका' देणारी बातमी, सरकार बदलताच तो निर्णय बदलला

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे सरकराने महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अनेक निर्णय बदलले.

संजय पाटील | Updated: Aug 6, 2022, 05:07 PM IST
Mumbai : मुंबईकरांना 'झटका' देणारी बातमी, सरकार बदलताच तो निर्णय बदलला title=

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे सरकराने महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अनेक निर्णय बदलले. अनेक निर्णयांना स्थगिती दिली. आता मुंबईकरांना झटका देणारी अशीच एक बातमी आहे. महाविकास आघाडीच्या काळात संजय पांडे हे मुंबई पोलीस (Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) आयुक्त होते. त्यांनी मुंबईकरांना मोठा दिलासा मोठा निर्णय घेतला होता. मात्र संजय पांडे निवृत्त झाल्यानंतर आणि सत्तांतरानंतर हा निर्णय बदलण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना यापुढे खबरदारी घ्यावी लागणार आहे. (no parking and cars parked on the roadside will be towed decision of former Mumbai cp sanjay pandey has been changed by new government)

नक्की काय निर्णय बदलला? 

मुंबई पोलिसांकडून आता पुन्हा नो पार्किंगमध्ये असलेल्या गाड्या टोईंग करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना वाहनं पार्क करताना जरा सावधच रहावं लागणार आहे. अन्यथा भुर्दंड भरावा लागेलच, सोबत मनस्तापही सहन करावा लागेल.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त पांडे यांनी नो पार्कींग आणि रस्त्याच्याकडेला असलेल्या गाड्या टोइंग न करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय 5 मार्चला घेण्यात आला होता. 

विशेष म्हणजे नागरिकांचा प्रतिसाद पाहून प्रायोगिक तत्वावर घेण्यात आलेला हा निर्णय नियमित करण्याबाबतही पांडेंनी म्हटलं होतं. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता हा निर्णय बदलल्याने मुंबईकरांना मोठा झटका बसला आहे. 

मुंबईकरांना 24 तास आणि 365 दिवस कायमच वाहतूक कोंडीची सामना करावा लागतो. पांडेंनी घेतलेल्या निर्णयानंतर अनेक वाहनचालक बेछूटपणे कसेही वाहनं पार्क करत होते. आयुक्तांनी दिलेल्या मुभेचा काही जणांकडून गैरफायदा घेतला जात होता. बेजबाबदारपणे रस्त्याच्या मध्येच कशीही गाडी पार्क केल्याने ट्राफिकचा प्रॉब्लेम होताच. 

त्यामुळे आता हा पांडेंचा निर्णय बदलण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता आम्ही पार्किंग कुठे करायची, असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. 

या निर्णयामुळे काही प्रमाणात गैरसोय होईल. मात्र बेजबाबदारपणे पार्किंग करणाऱ्यांना या निर्णयामुळे नक्कीच शिस्त लागेल, हे तितकंच खरं.