मुंबई : Sachin Vaze Updates : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) शुक्रवारी अँटिलिया स्फोटके प्रकरणी आणि ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेले मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाजे (Sachin Vaze) आणि इतरांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई पोलीस दलातील निलंबित सचिन वाझे (Sachin Vaze) यानेच उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर अँटेलियाखाली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी ठेवली होती. असे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.(NIA files charge sheet against Sachin Vaze) तसे NIA च्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. (NIA files charge sheet against Sachin Vaze, others in Antilia bomb scare-Hiren murder case)
अँटेलियाखाली ठेवलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणी मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze arrested) याला NIA कडून अटक करण्यात आली होती. एनआयएने विशेष न्यायालयात सुमारे 10,000 पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. एनआयएने अटक केलेल्या 10 जणांविरोधात काल 3 सप्टेंबर रोजी भारतीय दंड संहिता, शस्त्र कायदा, स्फोटक पदार्थ कायदा आणि Explosive Substances Act and Unlawful Activities (Prevention) (प्रतिबंध) Act (UAPA) संबंधित कलमांखाली मुंबईतील विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले आहे. तसे एनआयएने एका निवेदनात म्हटले आहे.
मुंबईतील अँटेलियाखाली गाडीत स्फोटके सापडलेल्या प्रकरणात वाझे याची चौकशी करून त्यांना अटक केली गेली. सचिन वाझे हा सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होता. मात्र, उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी संशयित असलेल्या वाझे याला पोलिसांनी अटक केली होती.
दरम्यान, सचिन वाझे उपचारासाठी भिवंडीतील काल्हेर येथील एस एस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी सचिन वाझे हा सध्या तळोजा रुग्णालयात असून नुकताच न्यायालयात त्याने आपल्या आजारासंदर्भात महिती देऊन खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मागितली असता न्यायालयाने खासगी रुग्णालयात उपचारासाठी पंधरा दिवसांची मुभा दिली आहे. त्यानुसार त्याला उपचारासाठी भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील एस एस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे याच्या हृदयात ब्लॉकेज असून त्यावर एन्जोग्राफी आणि गरज पडल्यास एन्जोप्लास्टी करण्यात येणार असल्याची महिती दिली गेली आहे. या ठिकाणी रुग्णालयाबाहेर स्थानिक नारपोली पोलिसांसह गुन्हे शाखा, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई येथील पोलीस बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहे.