पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना नवीन वर्षाचं आणखी एक गिफ्ट

चर्चगेट ते बोरीवली दरम्यान 25 डिसेंबरपासून एसी लोकल सुरु झाल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना नवीन वर्षाचं आणखी एक गिफ्ट मिळणार आहे. 

Updated: Jan 1, 2018, 11:48 AM IST
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना नवीन वर्षाचं आणखी एक गिफ्ट title=

मुंबई : चर्चगेट ते बोरीवली दरम्यान 25 डिसेंबरपासून एसी लोकल सुरु झाल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना नवीन वर्षाचं आणखी एक गिफ्ट मिळणार आहे. 

एसी लोकलचा विरारपर्यंत विस्तार

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून एसी लोकलचा विरारपर्यंत विस्तार होणार आहे. एसी लोकलच्या दिवसभरात बारा फे-या होणार आहेत. चर्चगेट-बोरीवली एसी लोकलला प्रवाशांचा ब-यापैकी प्रतिसाद मिळतोय. 

विरारपर्यंत धावणा-या एसी लोकलला डहाणू लोकलप्रमाणेच थांबे आहेत. काही फेऱ्या ऐन गर्दीच्या वेळी सुटणार असल्याने प्रवाशांचा त्याला कसा प्रतिसाद मिळतो याकडं नजरा लागल्यात.