Presidential Election 2022 : मुख्यमंत्र्यांचा 'मिशन 200' फेल, राज्यातून द्रौर्पदी मुर्मू यांना इतकी मतं

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून द्रौर्पदी मुर्मू यांना 200 मत मिळतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला होता. 

Updated: Jul 22, 2022, 12:02 AM IST
Presidential Election 2022 : मुख्यमंत्र्यांचा 'मिशन 200' फेल, राज्यातून द्रौर्पदी मुर्मू यांना इतकी मतं title=

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून दौर्पदी मुर्मू यांना 200 मत मिळतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला होता. मात्र त्यांचं हे मिशन 200 फेल ठरलंय. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार दौर्पदी मुर्मू यांना राज्यातून 190 पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा हा दावा फोल ठरला आहे. (nda prsident post candidate draupadi murmu given 181 votes in maharashtra cm eknath shinde 200 votes claim unsucess)

राज्यातून मुर्मूंना किती मतं? 

महाराष्ट्रातून मुर्मू यांना 181 इतकी मतं मिळाली आहेत. यामध्ये भाजप आमदारांच्या 113 मतांचा समावेश आहे. तर शिंदे गटातील 52 आमदारांची प्रत्येकी 1 यानुसार 52 अशा मतांचा समावेश आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुर्मूना पाठिंबा जाहीर केला होात. त्यामुळे राज्यातून मुर्मूना मिळालेल्या मतांची संख्या ही एकूण 181 इतकी आहे. अन्यथा भाजप आणि शिंदे गटाची मत लक्षात घेतली तर त्याचा आकडा हा 165 इतकाच आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीचा यशवंत सिन्हा यांना एकगठ्ठा मतदान

दरम्यान दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनाच मतदान केलंय. त्यामुळे सिन्हा यांना राज्यातून एक गठ्ठा 98 मतं मिळाली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मुर्मू यांना राज्यातून 200 मत मिळतील हा अतिवश्वास चुकीचा ठरला आहे.