'शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी, राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याचं वक्तव्य

शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार...?

Updated: Jun 17, 2021, 03:57 PM IST
'शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी, राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याचं वक्तव्य title=

दीपक भातुसे, मुंबई : काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत असेल तर महाविकास आघाडीतील उरलेले दोन पक्ष म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवेल अशी भूमिका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आली आहे. सामनाद्वारे शिवसेनेकडून ही भूमिका मांडल्यानंतर राष्ट्रवादीनेही तिच भूमिका मांडत शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही भूमिका मांडली आहे. 

महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत आणि या तीनही पक्षांनी एकत्र रहायला प्राधान्य दिलं पाहिजे. मात्र त्यातून एखाद्या पक्षाची स्वबळावर निवडणूक लढायचं इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील. त्यादृष्टीने सामनामध्ये मत व्यक्त केलेलं दिसतंय, असं जयंत पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितलं. तसंच ही महाराष्ट्रातील जनतेची तशी इच्छा दिसतेय, असंही ते म्हणालेत.

याप्रकरणी पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सध्या स्वबळावर निवडणूक लढवायचं म्हणतायत. पक्ष वाढवण्यासाठी कदाचित ते म्हणत असतील. पण शेवटी प्रत्येक पक्षाचं बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटीत काम करणं अपेक्षित आहे. ते आज जरी असं म्हटलं तरी निवडणुका जवळ आल्यावर ते कदाचित वेगळा विचार करू शकतील. पण त्यांनी वेगळा विचार केलाच नाही तर समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहतील.

शरद पवारांनीही राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना राज्यात महाविकास आघाडी एकत्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवेल अशी भूमिका मांडली होती. मात्र त्यानंतर काँग्रेसने स्वबळाचा नारा देणं सुरू केलं आहे. भविष्यात काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्यावर ठाम राहिला तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आलेले पहायला मिळतील. 

जयंत पाटील काय म्हणाले ?

- महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत आणि या तीनही पक्षांनी एकत्र रहायला प्राधान्य दिलं पाहिजे
- त्यातून एखाद्या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढायचं इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील
- त्यादृष्टीने सामना मत व्यक्त केलेलं दिसतंय
- महाराष्ट्रातील जनतेची तशी इच्छा दिसतेय
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सध्या म्हणतायत 
- पक्ष वाढवण्यासाठी कदाचित ते म्हणत असतील
- शेवटी प्रत्येक पक्षाचं बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे
- त्यामुळे तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटीत काम करणं अपेक्षित आहे
- ते आज जरी असं म्हटलं तरी निवडणुका जवळ आल्यावर ते कदाचित वेगळा विचार करू शकतील
- पण त्यांनी वेगळा विचार केलाच नाही तर समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहतील

राज्यपाल भेट

- राज्यपालांना भेटलो त्यांना शुभेच्छा दिल्या
- त्यांनी राज्यपाल म्हणून राज्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन राज्याला मार्गदर्शन करावं अशा शुभेच्छा दिल्या आहेत
- १२ आमदारंचे प्रकरण बरेच दिवस त्यांच्याकडे आहेत
- त्यावर त्यांचा विचार झालेला नाही
- महाराष्ट्रात पूर्वी अशी प्रथा नव्हती, पण यावेळी विलंब झाला आहे
- पण आज त्यांचा वाढदिवस आहे, शुभेच्छा देण्यापुरता त्यांचा आणि माझ्या भेटीचा विषय होता

प्रदीप शर्माला अटक

- महाराष्ट्र पोलीस यात तपास करत होते
- त्यांनी चांगला तपास सुरू केला होता
- मात्र आता हा तपास एनआयएकडे गेला आहे
- आमची अपेश्रा आहे
- मनसुख हिरेनची हत्या कुणी केली हे महारष्ट्राला कळलं पाहिजे
- आणि कितीही उच्चपदस्थ असेल त्याच्यापर्यंत हा तपास गेला पाहिजे
- दुर्दैवाने आतापर्यंत अटक झालेले सगळे पोलीस दलातील आहेत
- सामान्य माणसाला अडचणीत आणण्याची अशी पद्धत पोलीस दलात असेल तर तेही गांभीर्याने त्याचा विचार करावा लागले
- प्रदीप शर्मांना अटक झाली, वाझे असो किंवा आणखी कुणी असो त्यांनी दिलेल्या माहितीवर जो कोणी असेल त्यांना अटक झाली पाहिजे
- अँटलिया प्रकरणात स्फोटकं कुणी ठेवली, का ठेवली, मनसुख हिरेनची हत्या कुणी केली याचा सगळ्याचा तपास झाला पाहिजे
- सध्या एनआयएचा तपास क्रूमगतीने सुरू आहे
- प्रदीप शर्मांना अटक झाली याचा अर्थ त्यांच्याकडे याप्रकरणी माहिती असेल

भाजप-शिवसेना राडा

- राम भक्तांनी भक्तीभावाने मंदिरासाठी निधी देयातय
- हा गोळा झालेल्या पैशात भ्रष्टाचार होत असेल
- मंदिर बांधण्यात भ्रष्टाचार करत असतील तर रामापासून हे किती दूर आहे आणि राम त्यांच्यापासून किती दूर आहे हे दिसतं
- रामाच्या नावाचा आधार घेऊन राजकीय आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न करतायत काही लोक करतायत हे लोकांसमोर आलं
- राम मंदिरातील जमा-खर्चावर त्रयस्थ समितीने लक्ष ठेवावं