आताची मोठी बातमी! शुभांगी पाटील यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश, पक्षात मोठी जबाबदारी मिळणार

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत शुभांगी पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर आज त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला

Updated: Feb 4, 2023, 04:20 PM IST
आताची मोठी बातमी! शुभांगी पाटील यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश, पक्षात मोठी जबाबदारी मिळणार title=

Maharashtra Politics : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आणि शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. राज्यात सर्वाधिक चर्चा झालेल्या विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency election) अपक्ष असलेल्या सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा पराभव केला. शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता.  

शुभांगी पाटील यांची प्रतिक्रिया
एका सामान्य घरातल्या मुलीला इतकी मतं मिळाल्याबद्दल शुभांगी पाटील यांनी मतदारांचे आभार मानले, तसंच आता आम्ही थांबणार असं त्यांनी म्हटलं आहे. आज शुभांगी पाटीला यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. आता मी शिवसैनिक म्हणून लढेन, 'आम्ही सगळे एक आहोत, एक राहू' असं पक्ष प्रवेशानंतर शुभांगी पाटील यांनी सांगितलं. सगळ्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती, ती मी पूर्ण करेन असंही त्यांनी सांगितलं. कुठे तरी मी कमी पडली असेन, नाना पटोले, जयंत पाटील, अजित दादा, शरद पवार, उद्धव ठाकरे सगळ्यांचा आधार होता असंही शुभांगी पाटील यांनी सांगितल. 

सत्यजीत तांबे विजयी
नाशिक पदवीधर निवडउकीत सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe)  यांना 68 हजार 999 मतं मिळवली. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतांवर समाधान मानावं लागलं. शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी पराभव झाला.

निवडणुकीआधी मोठा ड्रामा
भाजपकडून आलेला एबी फॉर्म वेळेत न मिळाल्यामुळे शुभांगी पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यातच सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अचानक उमेदवारी दाखल केल्यामुळे आणि भाजपकडून त्यांना पाठिंबा दिला जाण्याची चर्चा सुरू झाल्यावर शुभांगी पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांशी संपर्क साधला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शुभांगी पाटीला यांना मविआचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं.

कोण आहेत शुभांगी पाटील?
शुभांगी पाटील या महाराष्ट्र राज्य टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्षा आहेत. त्यांचं बीए. डीएड. एम.ए. बीएड. एलएलबी शिक्षण झालं आहे. 22 सप्टेंबर 2022 मध्ये त्यांनी भाजपता प्रवेश केला. महाराष्ट्र स्टुडंटस असोसिएशनच्या त्या संस्थापक आहेत. 

पक्षात मोठी जबाबदारी
शुभांगी पाटील यांनी अधिकृत शिवबंधन बांधून शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये पक्ष प्रवेश केला आहे.  लवकरच त्यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी दिली जाईल असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.  शुभांगी पाटील अत्यंत जोमाने लढल्या अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.