'सुशांतच्या प्रकरणाला आता योग्य दिशा मिळेल'

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार

Updated: Aug 19, 2020, 04:41 PM IST
'सुशांतच्या प्रकरणाला आता योग्य दिशा मिळेल' title=

मुंबई : 'सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता योग्य दिशा मिळेल. CBI कडे केस जाऊ नये म्हणून जेवढे प्रयत्न केले तेवढे प्रयत्न हे कोरोनामुळे मृत्यू होऊ नये यासाठी केले पाहिजे होते', असं वक्तव्य भाजप नेता नारायण राणे यांनी केलं आहे.  एक व्यक्तीसाठी एक मंत्र्यासाठी हे सरकार चाललं आहे, कोणत्याही अन्य मंत्र्यांचा पाठींबा आहे? काही मंत्र्यांना पार्टीला जायला वेळ आहे. कॅबिनेटला जायला वेळ नाही. यामुळे संजय राऊत तोंडावर पडले आहेत, असं भाजप नेता नारायण राणे यांनी म्हटलं आहे. 

अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. रियाविरोधात पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केली होती. याच प्रकरणाची कारवाई ही पाटण्याऐवजी मुंबईतून केली जावी अशी मागणी करणारी याचिका तिनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. 

बिहार सरकारने दाखल केलेली एफआयआर योग्य असून बिहार सरकारला तपासाचा अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. बिहार पोलिसांचा अर्ज वैध असल्याचं सर्वाच्च न्यायालयाने म्हटलंय. मुबंई पोलिसांनी, महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावं. तसंच सर्वाच्च न्यायालयाकडून केस फाईल सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी लोकशाहीचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तपासासाठी आम्हाला सहकार्य केलं गेलं नाही, आमच्या अधिकाऱ्याला कैद्याप्रमाणे वागवलं असल्याची टीका त्यांनी केली.मात्र आता निपक्षपातीपणे तपास होईल, असं ते म्हणाले आहेत.