Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला महामोर्चा, उद्धव ठाकरे यांची घोषणा

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या महामोर्च्यात (Grand March) सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं. 

Updated: Dec 5, 2022, 07:27 PM IST
Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला महामोर्चा, उद्धव ठाकरे यांची घोषणा title=
(फोटो सौजन्य - ANI)

mahavikas aghadi grand march : महाविकास आघाडीच्यावतीने (Mahavikas Aaghadi) शिवसेना (Shiv Sena) उद्धव ठाकरे गटाचे (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thacekray) यांनी महामोर्च्याची (Mahamorcha) हाक दिली आहे. त्यानुसार मुंबईत (Mumbai) येत्या 17 डिसेंबरला मविआचा महामोर्चा निघणार आहे. हा महामोर्चा फक्त राज्यपाल हटाव (Governor) या एकमेव उद्देशासाठी नाही. तर महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान करणाऱ्यांसाठी आहे. या महामोर्च्यात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. मविआची बैठक पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत (Press Confrence) ठाकरे बोलत होते. (mva mahavikas aghadi grand march on 17 december in mumbai form jijamata udyan to azad maidan uddhav thackeray announcement maharashtra politics)

असा असेल महामोर्चा

"या महामोर्च्याला 17 डिसेंबरला सकाळी 10 वाजता जिजामाता उद्यान भायखळा इथून सुरुवात होईल. तर आझाद मैदानात मोर्च्याची सांगता होईल. या महामोर्च्यात महाराष्ट्रप्रेमींनी सहभागी व्हावं", असं आवाहन ठाकरे यांनी केलं.  

ठाकरे काय म्हणाले?

"हा राजकीय लढा नाही, तर राज्यासाठीचा लढा आहे. नंतर महाराष्ट्राला कुणीही विचारणार नाही.  हा मोर्चा फक्त राज्यपालांना हटवण्यासाठी या एकाच मुद्दयासाठी नाही. ज्यांनी राज्याचा अपमान केला त्यांच्याविरोधात आहे. हा मोर्चा एक सुरुवात असेल. आधी सुरुवातीला इशारा देऊयात.  त्यानंतर एक एक पाऊल टाकायला हरकत नाही", असं ठाकरे यांनी नमूद केलं.