मुंबईत अजूनही अनेक कंपन्यांमध्ये 'वर्क फ्रॉम होम' नाही

शहरात अजूनही अनेक कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम'वर पावलं उचलली नसल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर होत आहेत.

Updated: Mar 19, 2020, 04:06 PM IST
मुंबईत अजूनही अनेक कंपन्यांमध्ये 'वर्क फ्रॉम होम' नाही title=

मुंबई : शहरात अजूनही अनेक कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम'वर पावलं उचलली नसल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर होत आहेत. कंपनीत येऊन काम करण्याची सक्ती तसेच काही 'वर्क फ्रॉम होम'ची तयारी काही कंपन्यांची सुरु असल्याने मुंबई लोकल आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

अनेक कंपन्यांनी १०० टक्के घरून काम करण्यावर जोर दिला आहे, तर काही कंपन्यांनी ७० ते ८० टक्के लोकांना घरून काम करण्याची विनंती केली आहे.

मात्र वैद्यकीय तसेच पोलीस सुरक्षा या सारख्या अत्यावश्यक सेवांसारख्या सेवा ह्या प्रत्यक्षात हजर राहूनच द्याव्या लागणार आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात रस्ते आणि लोकलची गर्दी कमी झाली आहे.

प्रत्यक्षात सर्व कंपन्यांची 'वर्क फ्रॉम होम'ची तयारी पूर्ण झाल्यानंतरच मोठ्या प्रमाणात वाहतूक कमी होणार आहे.