मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड आल्याने वाहतूक कोंडी, पावसाचा रेल्वेलाही फटका

मुसळधार पावसाचा फटाका वाहतुकीला बसला आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.  

Updated: Aug 4, 2020, 08:56 AM IST
मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड आल्याने वाहतूक कोंडी, पावसाचा रेल्वेलाही फटका  title=

मुंबई : मुसळधार पावसाचा फटाका वाहतुकीला बसला आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. ही दरड हटविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. तसेच मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला. काही ठिकाणी घराघरांमध्ये पाणी भरल्याने मुंबईकरांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. तसेच रेल्वे रुळावरही पाण्याखाली गेल्याने पश्चिम आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक धीम्यागतीने धावत आहे. 

मुसळधार पाऊस, दुपारी हाय टाईडचा इशारा; रेड अलर्ट जारी

कांदिवली येथे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळल्याने मीरा रोडहून मुंबईकडे येणारी वाहतूकही ठप्प झाली असून रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन ठप्प झाले आहे. डोंगराचा काही भाग एका समोरच कोसळला असून विजेचा खांबही कोसळला आहे. त्यामुळे संपूर्ण मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने मीरारोडहून मुंबईला येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र, मुंबईहून मीरारोडला जाणारा मार्ग सुरु आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला.

रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील (mumbai) झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने मुंबईकरांना रात्रभर जागून काढावी लागली आहे. तसेच रेल्वे रुळावरही (railway track) पाणी साचल्याने त्याचा अत्यावश्यक सेवेतील कामगारांना मोठा फटका बसला आहे.
 
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे संकल भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. तसेच रेल्वे रुळावरही पाणी भरल्याने पश्चिम आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली असून मध्य रेल्वेवरील वाहतूक धीम्यागतीने धावत आहे.  मुंबईतदादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. हिंदमातामध्ये तर दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील वाहतूक कोंडी झाली आहे. 

काही ठिकाणी झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने मुंबईकरांना रात्रभर जागून काढावी लागली आहे. तसेच रेल्वे रुळावरही पाणी साचल्याने त्याचा अत्यावश्यक सेवेतील कामगारांना मोठा फटका बसला आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने पश्चिम आणि हार्बर रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे. कुर्ला आणि सीएसएमटी दरम्यानची हार्बर रेल्वे बंद झाली आहे.