मुंबई : कोकणसह मुंबईत रात्रीपासून जोरदाप पाऊस कोसळत आहे. पावसाने (Rain) मुंबईचे (Mumbai) हाल केले आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. काल रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हिंदमाता, दादर टी.टी. किंग्ज सर्कल, सायन, चेंबूर, अंधेरी, सांताक्रूझ आणि इतर सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम दिसून येत आहे.
मुंबई शहरातील कुलाबा शहरात एक वाजेपर्यंत सुमारे २६९ मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ उपनगरी भागात ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून येत्या २४ तासांत जोरदार मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली.
Maharashtra: Severe waterlogging in various parts of Mumbai following incessant rainfall in the city; visuals from Parel East.
More than 230 mm of rainfall recorded in Mumbai city in the last 10 hours, according to Brihanmumbai Municipal Corporation pic.twitter.com/JVhEWcICvK
— ANI (@ANI) August 4, 2020
मुंबईव्यतिरिक्त ठाणे, पुणे, रायगड आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यांसाठीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस कालपासून सुरु आहे. रात्री भर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. दरम्यान, दुपारी १२.४५ वाजता मुंबईतही भरतीची (हाय टाइड) शक्यता आहे.
समुद्रात ४.५१ मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. लोकांना सावधनतेच्या इशारा देण्यात आला आहे. लोकांनी समुद्रात जाऊ नका तसेच समुद्राच्या किनाऱ्यापासून दूर रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
#WATCH Maharashtra: Waterlogging in Mumbai's Lower Parel following incessant rainfall in the area. pic.twitter.com/q6CrJkwPiU
— ANI (@ANI) August 4, 2020