Mumbai Local Viral Video : खचाखच भरलेल्या लोकलमध्ये 'त्या' तरुणीसाठी खास पार्टी, कारण जाणून व्हाल अवाक्

Mumbai Local Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधील (Mumbai News) अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. या लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Video) दुनियाच काही और असते. इथली दुनियादारी आणि मैत्री पाहण्यासारखी असते. महिला एका सीटसाठी हाणामारी करताना दिसले आहेत. पण याच महिल्या डब्यातील एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. (ladies coach video)

नेहा चौधरी | Updated: Apr 3, 2023, 07:28 PM IST
Mumbai Local Viral Video : खचाखच भरलेल्या लोकलमध्ये 'त्या' तरुणीसाठी खास पार्टी, कारण जाणून व्हाल अवाक् title=
mumbai Wedding In Local Train Kasara girls Bride To Be Celebration vdieo viral on Instagram google trends trending video

Mumbai Local Viral Video : सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेन आणि दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडीओ रोज व्हायरल (Couple Viral Video) होत असतात. गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकल ट्रेनमधील कपलचा रोमान्सचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले (Couple Romance Viral Video) आहेत. मध्यंतरी लोकलमध्ये मद्यपान करताना एका तरुणाचा व्हिडीओने तर मुंबईकरांची झोप उडवली होती.  (trending video on Social media)

लोकलमधील दुनियादारी !

खरं तर या मुंबई लोकलमध्ये अनेक जाती धर्माचे गरीब श्रीमंत आणि वयाची कुठलेही मर्यादा नसलेले असंख्य लोकं एका कुटुंबासारखे इथे वावरतात. रोज ऑफिसला जाण्या येण्यासाठी या मुंबईकरांची लोकल ट्रेनची ठरलेली वेळ असते. त्यामुळे रोज ती माणसे त्यांना त्या डब्ब्यात भेटतात. यांची तरी ओळख नसते पण रोज त्याच लोकलमधून त्याच डब्ब्यातून प्रवास हाच त्यांचा नातातील एक धागा असतो. 

महिलांची तर बात काही और!

महिला लोकलमधील तर बातच काही और असते. या डब्ब्यात हळदी कुंकु, भाजी निवडणं, विणकाम, पोथी वाचणं असे अनेक काम सुरु असतात. अगदी या महिला गरब्या खेळण्यापासून प्रत्येक सण मोठ्या हौसीने साजरा करताना दिसतात. (mumbai Wedding In Local Train Kasara girls Bride To Be Celebration vdieo viral on Instagram google trends trending video)

सोशल मीडियावर मात्र महिला डब्ब्यातील एका सीटसाठी त्यांची हाणामारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेटकरी पण हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहतात. अगदी ते व्हिडीओ गुगलवर ट्रेंडही होतात. 

खास तिच्यासाठी लोकलमध्ये पार्टी!

सध्या सोशल मीडियावर महिला डब्ब्यातील एक व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधन घेतं आहे. कारणही तसंच आहे...खचाखच भरलेल्या डब्ब्यात बसयला काय उभं राहायला पण जागा नाही. अशात काही महिला फुगे उगविताना दिसतं आहे. तर एक तरुणी तिचे हेअरस्टाईल करत आहेत. कारण याच तरुणीसाठी तिच्या या महिला डब्ब्यातील मैत्रीणींनी खास पार्टी ठेवली आहे. कारण तिचं लवकरच लग्न होणार आहे.

Bride To Be!

हो बरोबर,  या तरुणींसाठी तिच्या लोकलमधील महिला ग्रुपने खास पार्टीचं आयोजन केलं होतं. त्या होणाऱ्या नवरीला बसायला जागा पण नाही तरी तिने उभे राहून त्याच्यासाठी या गर्दी तिच्या मैत्रीणींनी आणलेला केक कापला. तिला खास संदेश लिहलेलं एक पत्रही देण्यात आलं. 

या व्हिडीओमधील एक अजून खास गोष्ट म्हणजे शेजारच्या डब्ब्यातील एका चिमुकल्याला त्यांनी केकही भरवला. एकंदरीत या महिला आणि तरुणींनी मस्त मजा केली. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील 
localtrain_girl या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

लेक चालली...

ही लोकल  ट्रेन कसारा असावी कारण हा व्हिडीओ शेअर करताना #kasaragirls असं लिहण्यात आलं आहे. शिवाय तिला देण्यात आलेल्या पॉकेटवरही कसारा ट्रेन ग्रुप असं लिहिलं आहे. तर या वधूचं नाव प्रियंका पाटील असं आहे. प्रियंका लग्नानंतर वाशिंदला जाणार आहे म्हणून केकवर खास लिहिलं आहे की, लेक चालली वाशिंदला...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ यूजर्सला खूप आवडत आहे. अनेक यूजर्स म्हणत आहेत की, हे फक्त मुंबईतच घडू शकतं. काही यूजर्स म्हणत आहेत की, हाच खरा आनंद आहे.

हेही सुद्धा वाचा - Mumbai Local Viral Video: एक मिठीत तर दुसरी मांडीवर, खचाखच भरलेल्या लोकलमध्ये कपलचे अश्लील चाळे