मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Central Railway Service Disrupted : मध्ये रेल्वे मार्गावरील (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे.  

Updated: Oct 13, 2021, 10:52 AM IST
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=
संग्रहित छाया

मुंबई : Central Railway Service Disrupted : मध्ये रेल्वे मार्गावरील (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. आसनगाव स्थानका दरम्यान ही घटना घडली असून अनेक गाड्यांना याचा फटका बसला आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या आहेत. (Mumbai train service disrupted on central railway)

ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कल्याण - कसारा दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, 6 ऑक्टोबर रोजी अचानक आलेल्या पावसाचा मध्य रेल्वेवर परिणाम झाला होता. ओव्हरहेड वायरमुळे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. कल्याण रेल्वे स्टेशन ते इगतपुरी रेल्वे स्टेशन दरम्यान पॉवर सप्लाय नसल्यामुळे अप आणि डाऊन रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. 

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत होण्यामागे ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. आसनगांव रेल्वे स्थानकात वीज पुरवठा खंडीत झाल्याने याचा परिणाम लोकल सेवेवर झाला आहे.

आता पुन्हा एकदा ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कार्यालयीन वेळेदरम्यान, ही घटना घडल्याने नोकरदार वर्गाला याचा फटका बसला आहे.