Video : फोनवर बोलत असताना तरूणी आली ट्रेन खाली, पण सुदैवाने वाचली...

 देव तयारी त्याला कोण मारी ह्याची प्रचिती कुर्ला येथे अनुभवायास मिळाली ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात बंदिस्त झाली आहे ,मात्र नेहमीच देव तारेलच असे नाही त्यामुळे आपण मात्र असे करू नका . 

Updated: Jun 7, 2017, 05:48 PM IST
Video : फोनवर बोलत असताना तरूणी आली ट्रेन खाली, पण सुदैवाने वाचली... title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, कुर्ला :  देव तयारी त्याला कोण मारी ह्याची प्रचिती कुर्ला येथे अनुभवायास मिळाली ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात बंदिस्त झाली आहे ,मात्र नेहमीच देव तारेलच असे नाही त्यामुळे आपण मात्र असे करू नका . 

कुर्ला रेल्वे स्थानक हे नेहमी प्रमाणे वर्दळीचे होते, रेल्वे प्रशासन रेल्वे रूळ ओलांडू नका असे वारंवार सांगत असताना सुद्धा फ्लॅट क्रमांक सातवर एक मुलगी कुर्ला स्टेशन येथील रेल्वे रूळ ओलांडत होती ही पहिली चुकी आणि दुसरी चुकी होती ती रेल्वे रूळ ओलांडताना फोनवरही बोलत होती त्याच दरम्यान समोरून माल गाडी आली, तसे फलाटावरील प्रवाशांनी ओरडून तिला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र फोन वर बोलत असल्याने लक्ष सर्व फोन मध्ये होते, तर फलाटावरील एक महिला तिला वाचवायला पुढे देखील येते मात्र लहान मुलगी समय सूचकता दाखवत तिला मागे खेचते हा सर्व खेळ काही सेकंदाचा होत असताना अखेर गाडी खाली ती मुलगी आली,सर्वानी वाटते कि तिचे जीवन संपले मात्र काही प्रवाशांना तिची हालचाल बघून ती व्यवस्थित असल्याचे पहिले, त्वरित रेल्वे पोलिसांच्या मदतीने राजावाडी रुग्णालयात नेले आणि उपचार करून घरी सोडण्यात आले.

 

या अपघातातून सुखरूप वाचलेली आणि प्रत्यक्ष  मृत्यूच्या दारातून परत आलेली प्रतीक्षा मयेकर हि भांडुपला राहत असून नोकरीच्या शोधात ती कुर्ल्याला आली होती, घाई घाई त रेल्वे रूळ ओलांडत होती त्यात  कानाला मोबाईल आणि हेडफोन लावला असल्याने तिला गाडीचा आवाज ऐकू आला नाही आणि अपघात झाला,स्वतः भीषण अपघातातून बचावल्याने कोणीही  रेल्वे रूळ ओलांडू नये असे आवाहन ती सर्वाना करीत आहे 

खरंच देव तयारी त्याला कोण मारी मात्र नेहमीच देव तारेलच असे नाही त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडू नका, काही मिनिटाचा वेळ आपण खर्च करून पादचारी पुलाचा वापर करा, काही सेकंदातच आयुष्य होत्याचे नव्हते होऊ शकते ,आपल्या घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे याची जाणीव ठेवा आणि सुरक्षित प्रवास करा.