Mumbai Toll Tax: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी शिंदे सरकारने महत्वाचा निर्णय घेत टोल माफी जाहीर केली. यामुळे मुंबईत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या एन्ट्री पॉइंटवरील सर्व पाचही टोल प्लाझांवरील हलक्या वाहनांना टोल टॅक्सपासून हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे रोजच्या साधारण 2.8 लाख वाहन चालकांना फायदा होणार आहे. टोल टॅक्स हटल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणारे वाहनचालक वर्षाकाठी एक मोठी रक्कम जमा करु शकतात.
महाराष्ट्र निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मुंबईच्या एन्ट्री पॉइंटवरील टोल फ्री केलाय. पाचही टोल बूथवरुन मुंबईत येणाऱ्या किंवा मुंबईतून जाणाऱ्या हलक्या वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही. कामाच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या वाहन चालकांना याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास निगम म्हणजेच एमएसआरडीसीने यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. एलबीएस रोड, मुलूंडमधील इस्टर्न एक्सप्रेस हायवे, ऐरोली क्रीक ब्रीज, दहिसरमधील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वाशीतील क्रीक ब्रिगेड या पाचही स्थानकावरुन येणाऱ्या छोट्या वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही. या निर्णयामुळे साधारण 2.8 लाख हलक्या वाहनांना मोटार वाहनांना याचा फायदा मिळणार आहे.
सरकारने दहीसर, मुलूंड,ठाणे, ऐकोली आणि वाशी टोल प्लाझावरील छोट्या वाहनांवरील टोल माफ करण्यात आलाय. अवजड वाहनांकडून पुर्वीप्रमाणे टोल घेतला जाणार आहे. या टोलवर छोट्या वाहनांकडून 45 रुपयांपासून 75 रुपयांपर्यंत टोल घेतला जातो. तुमच्यापैकी कोणी या टोलनाक्यावरुन जात असेल तर तुम्हाला किमान 45 रुपये टोल टॅक्स द्यावा लागू शकतो. तुम्ही आठवड्यातील किमान पाच दिवस या टोल नाक्यावरुन प्रवास करत असाल तर 45 रुपयांप्रमाणे पाच दिवसांचे 225 रुपये खर्च होतात. म्हणजेच वर्षभर तुम्ही टोलसाठी 11 हजार 700 रुपये खर्च करता.
तुमच्याकडे एसयूव्ही कार असेल तर टोल प्लाझावर 75 रुपये टोल टॅक्स द्यावा लागतो.म्हणजेच आठवड्याच्या पाच दिवस ऑफिसला जात असाल तर साधारण 375 रुपये खर्च करता. म्हणजेच वर्षाचे 19 हजार 500 रुपये टोलसाठी खर्च करता. टोल टॅक्स हटल्यामुळे तुमची ही रक्कम वाचू शकते. ज्याची तुम्ही सेव्हिंग करु शकता.