मुंबई : कुर्ला स्थानकातील पादचारी पूल पाडण्यासाठी शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. कुर्ला स्थानकातील पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवारी रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी रात्री ११.२५ नंतर डाऊन जलद लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान डाऊन धीम्या मार्गवर चालविण्यात येणार आहे . मात्र या लोकल विद्याविहार स्थानकात ,थांबणार नाही. तसेच उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामेसाठी रविवारी २४ नोव्हेंबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकातील पादचारी पूल तोडण्यासाठी शनिवारी (२३ नोव्हेंबर) रात्रीचा ब्लॉक घेण्यात घेण्यात येणार आहे.
माटुंगा ते मुलुंड कल्याण दिशेने जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत परिणामी माटुंगा ते मुलुंड या रेल्वे मार्गादरम्यान डाऊन/ सेमी जलद लोकल या डाऊन धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहे. तर मुलुंडनंतर पुन्हा डाऊन जलद मार्गवरुन लोकल धावतील. या ब्लॉकमुळे मेल/एक्सप्रेस आणि लोकल सुमारे २० मिनिटे उशीराने धावतील.
सीएसएमटी - चुनाभट्टी - बांद्रा - सीएसएमटी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११. १० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. परिणामी सीएसएमटी - वाशी/बेलापूर/पनवेल - सीएसएमटी या अप-डाऊन लोकल बंद असणार. या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल आणि वाशी फलाट क्रमांक ८ वरून विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.
बोरिवली ते गोरेगाव अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत परिणामी या मार्गवरील धीम्या लोकल जलद मार्गवरुन चालविण्यात येणार आहे. तसेच बोरिवली स्थानकात फलाट क्रमांक १,२,३,४,५ वर लोकलची ये-जा करता येणार नाही.