'सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नाही' पोलिसांचा अहवाल विधानपरिषदेत सादर

Prabhadevi Gun Fire Dispute: मुंबईतल्या प्रभादेवी इथं गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी बंदूकीतून गोळी झाडल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता, आता या प्रकरणाचा अहवाल विधानपरिषेदत सादर करण्यात आला आहे

Updated: Mar 10, 2023, 05:46 PM IST
'सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नाही' पोलिसांचा अहवाल विधानपरिषदेत सादर title=

Prabhadevi Gun Fire Dispute: शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना गोळीबार प्रकरणात पोलिसांनी (Mumbai Police) क्लिन चीट (Clean Cheat) दिली आहे. गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav) मुंबईतल्या प्रभादेवी इथं शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) आमने सामने आले होते. यावळी स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी गोळी चालवल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. पण पोलिसांच्या तपासात सरवणकर यांनी गोळीबार केला नसल्याचं सांगण्यात आलंय. याप्रकरणात पोलिसांनी दिलेला अहवाल विधानपरिषेदत (Vidhan Parishad) सादर करण्यात आला. यात आमदार सरवणकर यांच्या बंदूकीत गोळी सुटल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पण गोळी सरवणकरांनी झाडली नाही. तर सरवणकरांच्या बंदूकीतून अज्ञात व्यक्तीने गोळी झाडल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

यात आमदार सरवणकर यांच्या बंदूकीत गोळी सुटल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पण गोळी सरवणकरांनी झाडली नाही. तर सरवणकरांच्या बंदूकीतून अज्ञात व्यक्तीने गोळी झाडल्याचं पोलिसांनी म्हटलंय. यात पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासण्यात आले, तसंच 14 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या अहवालात देण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला सरकारने परिषेदत लेखी उत्तर दिलं. पोलिसांनी दिलेल्या अहवालावर ठाकर गटाचे नेते सचिन अहिर यांनी टीका केली आहे. हा सत्तेचा दुरुपयोग असून मुंबईतील कायदा-सुव्यवस्था ढासळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता पोलिसांनी अहवाल दिल्याचा आरोपही सचिन अहिर यांनी केला आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत दादर परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आले. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. शिंदे गटाचे आमदारही तिथे उपस्थित होते. यावेळी आमदार सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळी सुटली. याप्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर सदा सरवणकर यांच्याविरोधात 15 सप्टेंबरला आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पण सदा सरवणकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. याप्रकरणाची बॅलेस्टिक तज्ज्ञांकडून चौकशी करण्यात आली. त्याचा अहवाल तयार करण्यात आला. या अहवालानुसार सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळी सुटल्याचं स्पष्ट झालं होतं. पण आता सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळी सुटली असली तरी ती बंदूक अज्ञात व्यक्तीच्या हातात होती, आणि त्यावेळी गोळी सुटल्याचं मुंबई पोलिसांच्या अहवलात नमुद करण्यात आलं आहे.