मुंबई : शिवसेना उप शाखाप्रमूख सचिन सावंत यांच्या हत्येला दोन दिवस उलटून देखील अद्याप पोलिसांना आरोपींचा सुगावा लागलेला नाहीये. रविवारी रात्री कांदिवलीच्या आकुर्ली रोडवर सचिन सावंत यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान या हत्येच सीसीटीव्ही फुटेज झी मिडीयाच्या हाती लागल असून त्यात हत्ये नंतर पळून जाताना दोन्ही शूटर स्पष्ट दिसतायेत.
रविवारी रात्री आकुर्ली रोडवरील साई बाबा मंदिरासमोर सचिन सावंत यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. दोन अदन्यातांनी सचिन सावंत यांच्यावर जवळून फायरींग केली होती. एसआरए पुनरवीकासाच्या वादातुन त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे. दरम्यान दोन हल्लेखोरांसह एक वॉचर देखील ओपरेशन वर नजर ठेऊन असल्याच सीसीटीव्ही मध्ये दिसत असून मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा या हल्लेखोरांचा शोध घेतायेत.