रविवारी महत्त्वाचा प्लान असेल, तर आताच ही बातमी वाचा; नाहीतर होईल नुकसान

रविवारी गरज असेल तरच घराबाहेर पडा; आताची सर्वात महत्त्वाची बातमी 

Updated: May 14, 2022, 02:09 PM IST
रविवारी महत्त्वाचा प्लान असेल, तर आताच ही बातमी वाचा; नाहीतर होईल नुकसान  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मागील काही दिवसांपासून वातावरणात झालेले बदल पाहता हवामान खात्यानं अवेळी पावसाचा इशारा दिला. तर, आता आणखी एक मोठा इशारा देत नागरिकांना सतर्क करण्यात आलं आहे. त्यामुळं रविवारच्या दिवशी घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल, तर आधी ही बातमी वाचा.... 

मुंबईकरांसाठी ही बातमी अतीव महत्त्वाची. कारण, त्यांच्या प्रवासावरच याचे थेट परिणाम होणार आहे. 15 मे रोजी मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिनही रेल्वे मार्गांवर देखभालीच्या आणि काही तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Mumbai railway mega block)

मध्य रेल्वेनं ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली. ज्यामध्ये मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत वाहतूक किमान 15 मिनिटे उशिरानं असेल. पर्याय म्हणून धीम्या मार्गाची सर्व वाहतू जलदगतीच्या मार्गावर वळवण्यात आली आहे. (Mumbai news )

तिथे हार्बर मार्गावर प्रवासी ठाणे-वाशी/ नेरुळ स्थानकांमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांना प्रवास करता येईल. 

कुर्ला ते वाशी या स्थानकांदरम्यान अप-डाऊन या दोन्ही मार्गिकांवर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 या वेळेत दुरुस्तीचं काम असेल. परिणामी वाहतू बंद राहील. 

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गिकांवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

थोडक्यात रविवारच्या दिवशी घराबाहेर पडणार असाल आणि त्यातही मुंबईच्या लोकलनं फिरण्याचा बेत आखत असाल तर मात्र विचार करुनच बाहेर पडा.