‘ठग्स...’ना मुंबई पोलिसांनी अशी दिली तंबी

फक्त मुंबई पोलिसच नव्हे तर, आसाम पोलिसांनीसुद्धा लढवली ही शक्कल 

Updated: Sep 30, 2018, 07:18 PM IST
‘ठग्स...’ना मुंबई पोलिसांनी अशी दिली तंबी  title=

मुंबई: काही दिवसांपूर्वीच विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शत ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. अमिताभ बच्चन, आमिर खान, फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच, सोशल मीडियावर त्यसंबंधीचे बरेच मीम्सही व्हायरल झाले.

अवघ्या काही क्षणांमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या या ‘ठग्स...’ची हवा ओसरण्यापूर्वी मुंबई पोलिसांनीसुद्धा याचा फायदा करुन घेतला.

‘धोखा स्वभाव है मेरा’ असा डायलॉग असणारं या ट्रेलरमधील एक दृश्य सोशल मीडियावर बरंच व्हायरल झालं. ज्याचा वापर करत ‘नो सिटी फॉर ठग्स’ अशा आशयाचं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं. हे ट्विट करताच अनेकांनी मुंबई पोलिसांच्या या फिल्मी अंदाजाची प्रशंसा केली.

फक्त मुंबई पोलिसच नव्हे तर, आसाम पोलिसांनीसुद्धा या चित्रपटामुळे व्हायरल झालेल्या मीम्सचा वापर करत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांना एक प्रकारे तंबीच दिली आहे, असं म्हणायला हरकत नाही.