'कोई नही बचेगा...' Mumbai विमानतळावर 'काळ्या जादू'चं सावट? एकच खळबळ

Mumbai News : विमानप्रवासाला निघालं असता प्रत्यक्षात प्रवास सुरु करण्याच्या साधारण तास दीड तास आधीपासूनच इथं पोहोचणं अपेक्षित असतं. पण...   

सायली पाटील | Updated: Oct 29, 2024, 09:11 AM IST
'कोई नही बचेगा...' Mumbai विमानतळावर 'काळ्या जादू'चं सावट? एकच खळबळ  title=
Mumbai news Airport passangers black magic hoax delays Akasa Air flight by almost one and half hour know how

Mumbai News : मागील काही दिवसांपासून मुंबई विमानतळासह देशभरातील विविध विमानतळांवर धमक्यांचे फोन आल्याचं पाहायला मिळालं. एकिकडे हे संकट शमण्याचं नाव घेत नाही, तोच आणखी एका विचित्र गोष्टीमुळं देशातील सर्वाधिक गजबजलेल्या, मुंबई विमानतळावर तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. 

 

hhatrapati Shivaji Maharaj International Airport (CSMIA) अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून श्रीनगरच्या दिशेनं निघालेल्या एका प्रवाशामुळं ही परिस्थिती ओढावली. ज्यामुळं रविवारी साधारण दीड तास विमानाचं उड्डण रखडलं. उच्च रक्तदाबामुळं आपल्याला विमानानं प्रवास करता येणार नाही, 
असं लक्षात येताच या प्रवाशानं विमानच आकाशात झेपावणार नाही असं म्हणत विचित्र तर्क मांडण्यास सुरुवात केली. 

विमानतळावर असणाऱ्या सीआयएसएफच्या जवानाला मुळच्या श्रीनगरच्या असणाऱ्या या व्यक्तीनं असं काही सांगितलं की तणावाच्या परिस्थितीनं डोकं वर काढलं आणि उड्डाण रखडलं. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी, एक 52 वर्षीय व्यक्ती असून, मोहम्मद युसूफ मलिक असं त्याचं नाव. ही व्यक्ती रविवारी श्रीनगरला जाणाऱ्या Akasa Air flight QP 1637 या विमानानं प्रवास करण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचली. तिथं पोहोचताच रक्तदाब वाढल्यामुळं (Blood Pressure) आपल्याला विमानात जाता येणार नाही हे प्रवाशाच्या लक्षात आलं. 

विमानतळावरील पोलीस उपनिरीक्षक मणीशंकर शत्रुघ्न राय हे त्यावेळी गेट क्रमांक 28 वर तैनात होते. जिथं, अकासा एअरलाईन्सकडून प्रवाशांना विमानात प्रवेश करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी बोर्डिंग गेट उघडण्याची विनंती केली. साधारण सकाळी 10 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास राय गेट क्रमांक 25 आणि 26 च्या मध्ये होते. तेव्हाच प्रवासी मलिक तिथं आला आणि मागूनच काही ऐकूही येणार नाही असं काहीतरी पुटपुटला. तो पुन्हा पुढे आला आणि राय यांच्यासमोर काहीतरी बोलला. शेवटी तुम्हाला नेमकं काय बोलायचंय? असं त्याला विचारण्यात आलं. अतिशय कातरत्या आणि संशयास्पद आवाजात त्यावेळी मोहम्मद मलिक त्यांना म्हणाला, 'ये फ्लाईट नही जा पाएगी, और कोई नही बचेगा...'

हेसुद्धा वाचा : Diwali Bonus : कर्मचारी मालामाल; भर दिवाळीत पगार भत्त्यात वाढ, पाहा कोणाला लागली लॉटरी 

प्रवाशाचं हे विचित्र बोलणं ऐकताच तातडीनं विमानात तपासणी करण्यात आली पण कोणताही संशयास्पद प्रकार तिथं आढळला नाही. ज्यावेळी मलिककडे त्याच्या या वक्तव्याबद्दल चौकशी करण्यात आली, तेव्हा आपल्यावर 'काळ्या जादू'चा प्रभाव असल्यामुळं काहीसं नैराश्यग्रस्त भासत असल्याचं त्यानं सांगितलं. या प्रवाशाच्या सामानाची झाडाझडती घेण्यात आली आणि तिथं मात्र काहीच संशयास्पद आदळलं नाही. मलिकची एकंदर अवस्था पाहून, एअरपोर्टवरच वैद्यकिय चाचणी विभागाकडून त्याची तपासणी करण्यात आली, जिथं अती तणावामुळं त्यांचा रक्तदाब वाढण्याचं लक्षात आलं होतं. 

सरतेशेवटी सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर अखेर विमान 12.04 वाजता आकाशात झेपावलं. सदर प्रकरणादरम्य़ान मलिकवर कलम 315 (4), 353 (1) (B) आणि 125 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.