मुंबई : मनसेनं फेरीवाला धोरण अंमलबजावणीसंदर्भात १९ सूचना आणि हरकतींची यादी मुंबई महापालिकेला सादर केलीय.
या यादीमध्ये राज्यात १५ वर्षे अधिवास असलेल्या फेरीवाल्यांनाच परवना देण्याची मागणी मनसेनं केलीय.
यासोबतच अनधिकृत फेरीवाल्यांकडून माल खरेदी करणा-या ग्राहकांना मार्शलद्वारा दंड आकारण्याचीही मागणी केलीय.
मनसेनं फेरीवाल्यांच्या बाजुनंही अनेक सूचना मांडल्या आहेत. जिथं फेरीवाला क्षेत्र घोषित करणं शक्य नसेल तर तेथे आठवडी बाजार भरवण्याची मागणी मनसेनं केलीय.
यासंदर्भात मनसेचे दादर विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी.
फेरीवाला धोरण अंमलबजावणीत मनसेच्या सूचना