MHADA : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची 700 घरं

Mhada Lottery 2023: स्वत:चं हक्काचं घर असाव असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. शहरातील घरांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांना हे स्वप्न धुसर वाटते. मात्र महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडामुळे अनेकांचं स्वप्न सत्यात उतरणार आहे. 

Updated: Feb 6, 2023, 09:03 AM IST
MHADA : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची 700 घरं  title=

Mhada Lottery 2023:  मुंबई, पुणे (mumbai, pune) असा भागात आपले घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते परंतु हे अनेकांना शक्य होत नाही. यासाठी राज्य शासन म्हाडाअंतर्गत (mhada home plan) सामान्यांना घरे देण्याची योजना राबवत असते. जर तुम्हाला म्हाडात घर घ्यायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण पहाडी गोरेगाव येथे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून पहिल्या टप्प्यात 3 हजार 15 घरे बांधली जात असून यात पहिल्यांदाच 35 मजली इमारतीसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी 27 मजली इमारत प्रस्तावित केले आहे. तसेच 35 मजली इमारतीत मध्यम गटासाठी 700 तर, 27 मजली इमारतीत 129 घरे असणार आहेत. 

म्हाडा पहिल्यांदा 35 मजली इमारत बांधणार 

म्हाडाच्या कामाच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. तेव्हा या प्रकल्पात दर्जात्मक घरे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच पहिल्यांदाच म्हाडाच्या इतिहासात 35 मजली इमारती बांधण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून म्हाडाकडून मार्चमध्ये 4 हजार घरांची सोडत काढली जाणार आहे. मात्र यामध्ये अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटाच्या अनामत रक्कमेत (Deposite)  दुप्पट वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.(Mhada Lottery 2023)

वाचा: थंडी जाणार पाऊस येणार! IMD कडून Alert

खासगी प्रकल्पाप्रमाणे सुविधा उपलब्ध करणार 

तसेच चार 35 मजली इमारती प्रस्तावित करण्यात असून याजागी खासगी प्रकल्पाप्रमाणे पहिल्यांदाच म्हाडा जलतरण तलाव, व्यायामशाळा, उद्यान यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार आहेय. दरम्यान भूखंड अ वरील 35 मजली तीन इमारती वगळत मंडळाने भूखंड अ आणि ब 4 हजार 600 ऐवजी 3 हजार 15 घरांच्या कामाला सुरुवात केली. यातील 2 हजार 683 घरे मार्चमध्ये पूर्ण होणार आहेत. यातील 2 हजार 605 घरे आगामी सोडतीत समाविष्ट करण्यात येणार असून 177 घरे म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.