आताची मोठी बातमी! मुंबई मेट्रोची कारशेड आरे कॉलनीतच होणार, बंदी उठवली

आरे कॉलनीत मुंबई मेट्रोची कारशेड (Aarey Car shed) उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा

Updated: Jul 21, 2022, 01:41 PM IST
आताची मोठी बातमी! मुंबई मेट्रोची कारशेड आरे कॉलनीतच होणार, बंदी उठवली title=

मुंबई : आरे कॉलनीमध्ये मुंबई मेट्रोची कारशेड (Aarey Car shed) उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आरेमधील कामावर गेल्या सरकारनं घातलेली बंदी उठवली आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री होताच पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचं कारण सांगत बंदी घातली होती. ही बंदी उठल्यामुळे आता आडीच वर्षांनी कारशेडचं काम पुन्हा सुरू होणार आहे. 

उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रोची कारशेड कांजुरमार्गला हलवण्याची प्रक्रिया सुरु केली होती. आरे परिसरात असलेल्या जंगलामुळे याठिकाणी मेट्रो कारशेड उभारण्याला विरोध करण्यात आलो होता. फडणवीस सरकारच्या काळात इथली झालं रातोरात कापून प्रकल्पाचं काम सुरु करण्यात आलं होतं. 

पण ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर मेट्रो कारशेडचं काम थांबवण्यात आलं आणि पर्यायी जागेचा शोध सुरु करण्यात आला. पण आता पुन्हा राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला आहे. त्यामुळे आरेतच मेट्रो कारशेडच काम सुरु करण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे.

या निर्णयाचं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी स्वागत केलं आहे.