मुंबई : Mayor Kishori Pednekar on Self Testing Kit : घरगुती चाचण्या (Self Testing Kit) किंवा रॅपिड अन्टीजेन संच उत्पादक, विक्रेते यांना संचाच्या विक्रीबाबतचे तपशील मुंबई महापालिकेला देणे बंधनकारक आहे. मुंबई महापालिकेने (BMC) या संचाच्या वापराबाबतची नियमावली जाहीर केली आहे. आता सेल्फ टेस्ट करणाऱ्यांनी विकत घेणाऱ्यांना आपला आधार कार्ड नंबर केमिस्टला द्यावा लागेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पालिकेचे यावर आता नियंत्रण असेल, हे स्पष्ट झाले आहे.
1 लाखांच्यावर लोकांनी सेल्फ टेस्ट केली आहे. यात 3549 पॉझिटिव्ह आलेत आहेत. या माध्यमातून कोणी वेगळा धंदा करणार असेल तर कडक कारवाई होईल, असे महापौर यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, नव्या नियमावलीनुसार, या चाचण्यांचे संच उत्पादन करणाऱ्या कंपन्या, औषध विक्रते किंवा वितरक यांना संच विक्री केलेल्यांची तपशीलवार माहिती मुंबईपालिकेने दिलेल्या ईमेल आयडीवर दररोज द्यावी लागणार आहे.
होम टेस्टिंग अँटीजेन किटचे उत्पादक/वितरकांनी क्रमांकाची माहिती देणे बंधनकारक असणार आहे . मुंबईतील केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर्स/डिस्पेन्सरी यांना विकल्या गेलेल्या किटचे फॉर्म A मध्ये आयुक्त , अन्न व औषध प्रशासन (FDA) यांना ईमेल आयडी whogmp.mahafda@gmail.com वर तसंच MCGM च्या एपिडेमियोलॉजी सेलला ईमेलवर आयडी ही माहिती उपलब्ध करुन देणे उत्पादकांना बंधनकार करण्यात आले आहे.
तुम्ही कितीही हल्ला करा,शिवसेनेचा मजबूत आहे. शिवसेना किल्लाप्रमाणे मजबूत आहे, असे प्रत्युत्तर महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमित साटम यांना दिले आहे. (Mayor Kishori Pednekar criticized on BJP) भ्रष्टाचार टिकेवर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एतकी वर्ष तुम्ही बरोबर होतात तेव्हा काय केलं. तुमच्या बुद्धीला तेव्हा गंज होता का, तुमच्याकडे पद होतं तरी तुम्ही काय केलं. मांडीला मांडी लावून नव्हे मांडीतच बसून होतात ना. विश्वास ठराव सर्वानुमते संमत व्हावा लागतो. तुमच्यासारख मीडियासमोर झळकायचं काम नाही.भाजपचं राजकारण खालच्या पातळीला जाते आहे, असा हल्लाबोल अमित साटम यांच्या पत्रकार परिषदेवर महापौर यांनी केला.
प्रत्येकाने आपला अजेंडा घेतलाय तो विरोधाचा घेतला आहे.यशवंत जाधव, इक्बाल चहल आपलं काम करत आहेत. चहल यांनी कोरोनामध्ये चांगलं काम केले, हीच विरोधकांची पोटदुखी आहे. हे सगळं निराशेतून यांची मुक्तफळे बाहेर येत आहेत. आपण अनेक वेळा कोरोना, राजकीय घटना यावरच बोलतो. आज वेगळ्या विषयावर बोलू, असे सांगत त्यांनी दुसऱ्या मुद्द्याला हात घातला.
आज मुक्या प्राण्यांबद्दल आपण बोलणार आहोत. पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी कुठेच नाही जे आहेत ते खासगी आहेत. दहिसर मध्ये स्मशानभूमीत पाळीव प्राण्यांसाठी शवदाहिनी बांधण्याचा पक्का निर्णय झाला झाला. अभिषेक घोसाळकर आणि तेजस्वीनी घोसाळकर यांच्या इथे पाळीव प्राण्यांसाठी शवदाहिनी बांधली जाणार आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणकर यांनी यावेळी दिली. अनेकदा प्राण्यांचे मृतदेह जागीच पडून असतात जे बघायला अतिशय वेदनादायक असते, असे त्या म्हणाल्या.