प्रकृती बिघडल्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल

किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Updated: Jun 29, 2020, 02:08 PM IST
प्रकृती बिघडल्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल title=
संग्रहित फोटो

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. किडनी स्टोनचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या २-३ दिवसांपासून तब्येत ठिक नसल्याने त्या घराबाहेर पडल्या नव्हत्या. आज त्रास वाढल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.