मुंबई पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर, दोन अधिकारी निलंबित

मुंबईतील सर्व २९६ पुलांची पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. पूल दुर्घटनेप्रकरणी कार्यकारी अभियंता ए. आर. पाटील आणि सहायक अभियंता एस. एफ. काकुळते यांना निलंबित करण्यात आले आहे. 

Updated: Mar 15, 2019, 08:15 PM IST
मुंबई पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर, दोन अधिकारी निलंबित title=

मुंबई : सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता ए. आर. पाटील आणि सहायक अभियंता एस. एफ. काकुळते अशी त्यांची नावं आहेत. तर निवृत्त प्रमुख अभियंता एस. ओ. कोरी आणि निवृत्त उपप्रमुख अभियंता आर. बी. तरे यांचीही सविस्तर चौकशी केली जाणार आहे. दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर झाला असून, दुर्घटनाग्रस्त हिमालय पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट योग्य प्रकारे करण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे. हे ऑडिट करणाऱ्या डी डी देसाई असोशियटसला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच त्यांच्याविरोधता गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत. 

मुंबईतील सर्व २९६ पुलांची पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालया पूल दुर्घटनेप्रकरणी कार्यकारी अभियंता ए. आर. पाटील आणि सहायक अभियंता एस. एफ. काकुळते यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर निवृत्त प्रमुख अभियंता एस. ओ. कोरी आणि निवृत्त उपप्रमुख अभियंता आर. बी. तरे यांचीही सविस्तर चौकशी केली जाणार आहे. पूल दुर्घटनेप्रकरणाचा चौकशी अहवाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

प्राथमिकदृष्ट्या स्ट्रक्चरल ऑडिट योग्य करण्यात आले नाही, असं दिसून येते आहे. निष्काळजीपणे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते, असा ठपका ठेवण्यात आहे. डी. डी. देसाई असोशियटसने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. ऑगस्ट २०१८ मध्ये केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल चांगला असल्याचा शेरा दिला होता. मात्र, आठ महिन्यात हा पूल कोसळला आणि यात सहा जणांचा मृत्यू झाला तर 36 लोक या दुर्घटनेत जखमी झालेत. अद्याप काही जण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

चौकशी अहवालात यांच्यावर ठपका

- पूल दुर्घटनेप्रकरणाचा चौकशी अहवाल जाहीर
- प्राथमिकदृष्ट्या स्ट्रक्चरल ऑडिट योग्य करण्यात आले नाही, असं दिसून येतंय
- निष्काळजीपणे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते
- डी डी देसाई असोशियटसने केले होते स्ट्रक्चरल ऑडिट
- ऑगस्ट २०१८ मध्ये केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल चांगला असल्याचा शेरा दिला होता.
- संबंधित आर्किटेक्चरला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश
- आर्किटेक्चरवर एफआयआर दाखल केले जाणार
- संबंधित आर्किटेक्चरचे सर्व कामे थांबवण्यात यावीत
- सर्व २९६ पुलांची पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार
कार्यकारी अभियंता ए आर पाटील व सहायक अभियंता एस एफ काकुळते यांना निलंबित करण्याचे आदेश
- निवृत्त प्रमुख अभियंता एस ओ कोरी आणि निवृत्त उपप्रमुख अभियंता आर बी तरे यांचीही सविस्तर चौकशी केली जाणार

- डी डी देसाई असोशियटस अँड कन्स्टलटंटने शहर भागातील ३९ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे