मुंबई : अरबी समुद्रालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्यात ढगाळ वातावारण निर्माण झालं आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र कोकण, गोवा येथे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुढील दोन दिवसात हवामान पुर्वस्थितीत येईल, असं पुणे वेढशाळेने सांगितलं आहे. मात्र पुढील आठवड्यात पुन्हा एकदा राज्यात ढगाळ हवामानाची आणि पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे.
मुंबईत मागील दोन महिन्यांपासून अनेक वेळा ढगाळ वातावरण राहिलेले आहे, या काळात प्रदुषणाचं धूर आणि धुकं मिळून अनेक वेळा शहरालर धुरकं पसरतं. या धुरक्यामुळे मुंबईकरांचे श्वसनाचे आजार बळावत असल्याचंही चित्र आहे. अनेक वेळा आकाश निरभ्र नसल्याने दुपारी किंवा सकाळी १० नंतर सूर्यकिरण मुंबईत पोहोचतात.