मुंबईतील स्टेट बँक मॉरिशिअसचा सर्व्हर हॅक; १४३ कोटी लुटले

या सगळ्यात बँकेतील कोणी कर्मचारी सामील आहे का?

Updated: Oct 12, 2018, 11:26 AM IST
मुंबईतील स्टेट बँक मॉरिशिअसचा सर्व्हर हॅक; १४३ कोटी लुटले title=

मुंबई: नरिमन पॉईंट येथील स्टेट बँक ऑफ मॉरिशिअसचा सर्व्हर हॅक करून तब्बल १४३ कोटी रूपये लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याबाबत बँकेने मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली आहे. 

बँकेचा सर्व्हर हॅक करून खात्यातून पैसे परदेशातील खात्यात वळते करण्यात आले. अद्याप हे हॅकिंग कसे करण्यात आले, याचा शोध लागलेला नाही. या सगळ्यात बँकेतील कोणी कर्मचारी सामील आहे का, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे. 

सध्या देशातील अनेक बॅंकाना हॅकर्सनी लक्ष केलं असून अलीकडच्या काळातील ही तिसरी घटना आहे. जवळपास महिन्याभरापूर्वी  कॉसमॉस बॅंकेच्या पुण्याच्या शाखेतून ९४ कोटी रूपये हॅकर्सनी काढले होते. तर काही महिन्यांपूर्वी युनियन बॅंकेतून ३४ कोटी रूपये लंपास करण्यात आले होते.