व्हिडिओ : पोलिसांसमोरच तरुणीनं कपडे काढले

मुंबईतील अंधेरीमधल्या ओशिवरा पोलीस ठाणे हद्दीतल्या एका उच्चभ्रू वसाहतीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

Updated: Oct 28, 2018, 08:34 PM IST
व्हिडिओ : पोलिसांसमोरच तरुणीनं कपडे काढले title=

मुंबई : मुंबईतील अंधेरीमधल्या ओशिवरा पोलीस ठाणे हद्दीतल्या एका उच्चभ्रू वसाहतीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. याला निमित्त ठरली ती मद्यधुंद अवस्थेतली तरुणी. या तरुणीला सिगरेट हवी होती. त्यासाठी तिने इमारतीच्या सुरक्षारक्षकाला सिगरेट आणायला सांगितलं. मात्र या मद्यधुंद तरुणीची एकंदर अवस्था पाहून सुरक्षारक्षकानं तिला सिगरेट आणून द्यायला नकार दिला. त्यामुळे रागानं बेभान झालेल्या या तरुणीनं सुरक्षारक्षकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत, मारहाणही केली.

तिचा हा एकदंर अवतार पाहून सुरक्षारक्षकानं पोलिसांना बोलावलं. मात्र ही तरुणी पोलिसांपुढेही वरमली नाही. सारेच ताळतंत्र सोडून ही तरुणी वर्तन करत होती. २५ सप्टेंबरचा हा व्हिडिओ आहे. मात्र झी २४ तास या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.