Mumbai Local Video : दिल तो बच्चा है जी! 'दो घुंट' गाण्यावर मुंबई लोकल ट्रेनमध्ये मुंबईकरांची धमाल, व्हिडीओ व्हायरल

Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ही मुंबईकरांची श्वास...या लोकलमध्ये एक वेगळ दुनियादारी बघायला मिळते. लोकल ट्रेनमधून रोज प्रवास करणाऱ्या त्या प्रत्येक मुंबईकरांना या आयुष्याचा अनुभव येतो. सोशल मीडियावर लोकल ट्रेनचे अनेक व्हिडीओ व्हायरल  (Social media Trending now) होतं असतात. मुंबईकरांची लोकलमधील धमाल मस्तीचा एक व्हिडीओ इंटरनेवर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

Updated: Mar 19, 2023, 11:24 AM IST
Mumbai Local Video : दिल तो बच्चा है जी! 'दो घुंट' गाण्यावर मुंबई लोकल ट्रेनमध्ये मुंबईकरांची धमाल, व्हिडीओ व्हायरल  title=
mumabi Local Train old man group Singing and dancing do ghoont mujhe bhi pila de sharabi video viral on Social media trending now

Mumbai Local Train Dance Video Viral : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमधील (Metro Viral Video) अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दिल्ली मेट्रोमध्ये डान्स करताना, एक तरुण टॉवलेमध्ये चढला तर एकदा मंजुलिका अवतरली आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली. मुंबई लोकलचेही अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर  (video viral on Social media )पाहिले जातात. या मुंबई लोकलमधील (Mumbai News) दुनियाच काही औरच आहे. या लोकल ट्रेनमधून प्रवास करणारा प्रत्येकाला याचा अनुभव येतो. नुकताच Norway च्या The Quick Style ग्रुपचा लोकलमध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

दिल तो बच्चा है जी !

त्यानंतर या ट्रेनमधील एक धक्कादायक व्हिडीओ (mumbai local news) समोर आला होता. ज्यात एक व्यक्ती लोकलमध्ये मद्यपान करताना दिसला. पण या लोकल ट्रेनमध्ये मुंबईकरांचं तासांतास जातात. अशावेळी एका डब्ब्यातून रोज प्रवास करणारे प्रवासी ओळखीचे होतात. मग हे सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा इथे एक भन्नाट आणि मजेदार दुनियादारी पाहिला मिळते. सध्या लोकल ट्रेनमधील ज्येष्ठ नागरिकांचा एक व्हिडीओ पाहून एकच गाणं आठवतंय दिल तो बच्चा है जी...(mumabi Local Train old man group Singing and dancing do ghoont mujhe bhi pila de sharabi video viral on Social media trending now)

'दो घुंट मुझे भी पिला दे शराबी'!

या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, प्रवासादरम्यान काही मुंबईकर बॉलीवूडच्या हिट गाण्यावर 'दो घुंट मुझे भी पिला दे शराबी' जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. एक काका तर या गाण्याला म्युझिक देण्यासाठी कच्च लोकल डब्याचा खिडकीजवळील पत्राचा वादक म्हणून मस्त उपयोग करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच खूष व्हाल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ट्रेनमधील धम्माल मस्ती व्हायरल 

हा व्हिडीओ _aamchi_mumbai_ नावाच्या एका इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. प्रवासादरम्यान लोक तणावापासून दूर करण्यासाठी असे अनेक प्रकारे आनंद शोधून काढतात. ती माणसं मुलांसारखं आयुष्य एन्जॉय करताना दिसतात. आयुष्यात प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या समस्येने ग्रासलं आहे. संकट आयुष्यात येतं राहतात पण असे बिनधास्त जगता आलं पाहिजे. म्हणून अनेक वेळा म्हटलं जातं की, मुंबईकरांसारखं स्पिरीट आणि मुंबईकरांसारखं जगणं आलं पाहिजे...