मुंबई : ठाणे - मुलुंड दरम्यान प्रगती एक्स्प्रेसचं इंजीन बिघडलं, यामुळे ऐनगर्दीच्या काळात मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली, मध्य रेल्वेच्या स्लो ट्रॅकच्या गाड्या फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली आहे, डाऊन मार्गाच्या वाहतुकीत हा बदल झाला आहे.
एका महिलेला वाचवताना, ब्रेक लावावे लागल्याने इंजीन खराब झालं असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र तरीही ही महिला या अपघातात बचावलेली नाही. इंजीनचा यात पाईप तुटला असल्याचं सांगण्यात येत आहे.
झी २४ तासचे प्रेक्षक, निलेश देशमुख यांनी ट्वीटने दिलेली काही माहिती
@zee24taasnews मुलुंड रेल्वे क्राॅसिंग जवळ एका महिलेला वाचवता वाचवता प्रगती एक्सप्रेसच्या मोटरमनने खुप अर्जंट मध्ये ब्रेक दाबल्यामुळे इंजिनचा एक पाइप फाटला गेला. एवढे करुनही महिला वाचली नाही. शरीराचे तुकडे झाले. आत्ताच तिच उर्वरीत प्रेत काढल गेलय आणि गाडीच इंजिनही बिघडलआहे.
— Nilesh R Deshmukh (@NileshRDeshmuk3) November 9, 2017
मुलुंड ठाणे दरम्यान ही घटना घडली आहे. मध्य रेल्वेची फास्ट ट्रॅकवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गर्दीत वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय.