Radhika Anant Ambani Age : Mukesh Ambani कुटुंबाची सून राधिका मर्चंट मुलगा अनंतपेक्षा मोठी? जाणून घ्या सत्य

Radhika Ananat Video : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा साखरपुडा राधिका मर्चंट (Radhika Merchant) सोबत मोठ्या थाट्यामाट्यात झाला. 

Updated: Jan 29, 2023, 12:17 PM IST
 Radhika Anant Ambani Age : Mukesh Ambani कुटुंबाची सून राधिका मर्चंट मुलगा अनंतपेक्षा मोठी? जाणून घ्या सत्य  title=
Mukesh Ambani Radhika Merchant Anant Ambani age difference Radhika Anant Romantic trending video viral on social media

Radhika Ananat Engagement Video :  रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani)  यांच्या घरी लग्नीन घाई असणार आहे. नुकतचं मुंबईत हिरे व्यापाऱ्याची मुलगी राधिका मर्चंटसोबत अनंत अंबानी यांचा साखरपुडा झाला. या साखरपुड्याला बॉलिवूडपासून खेळजगताली अगदी राजकारणातील दिग्गज मंडळी उपस्थित होते. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीविषय जाणून घ्यायला सर्वसामान्यांना खूप आवडतं. तुम्हाला माहिती आहे का की राधिका ही अनंत यांच्यापेक्षा मोठी आहे ते...काय आहे नेमकं सत्य जाणून घेऊयात...

अनंत आणि राधिकामधील किती वयाचं अंतर?

मिळालेल्या माहितीनुसार अनंत अंबानी यांचा जन्म 10 एप्रिल 1995 रोजी झाला होता. तर राधिका मर्चंट यांचा जन्म 18 डिसेंबर 1994 ला गुजरातमध्ये झाला. याअर्थ राधिका अनंत यांच्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे. राधिका मर्चंट ही अनंत अंबानींची बालपणीची मैत्रिण आहे. ती देशातील आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी एनकोर हेल्थकेअरची सीईओ आहे. तर अब्जाधीश उद्योगपती वीरेन मर्चंट यांची एकुलती एक मुलगी आहे. राधिका यांची आई शैला मर्चंट यादेखील खूप सुंदर आहेत. राधिकाला शास्त्रीय नृत्याची खूप आवड आहे. त्यांनी 8 वर्षांपासून भरतनाट्यमची दीक्षा घेतली आहे. (Mukesh Ambani Radhika Merchant Anant Ambani age difference Radhika Anant Romantic trending video viral on social media)

अनंत आणि राधिका यांचा रोमँटिक क्षण

मुंबईतील या ग्रँड सोहळ्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळाले. होणाऱ्या सुनेचं पारंपरिक पद्धतीने नीता अंबानी यांनी स्वागत केलं. त्यानंतर खास नवं जोडप्यासाठी अंबानी कुटुंबानी सप्रराईज डान्स केला होता. या सगळ्या क्षणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळाले. 

याच सोहळ्यातील अनंत आणि राधिका यांच्यामधील प्रेमही दिसून आलं. या सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात राधिका अनंत यांच्यामधील बाँडिंग दिसून आलं.