Financial Tips: तुमच्या फायद्याच्या १० गोष्टी, यामुळे तुमची स्वप्न पूर्ण होतील...

आपण सर्व स्वप्न बघतो आणि त्याला पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतो.

Updated: May 14, 2019, 08:19 PM IST
Financial Tips: तुमच्या फायद्याच्या १० गोष्टी, यामुळे तुमची स्वप्न पूर्ण होतील... title=

मुंबई : आपण सर्व स्वप्न बघतो आणि त्याला पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतो. पण, आयुष्यात गरजा खूप असतात आणि उत्पन्न मर्यादीत असतं. तर आपल्या स्वप्नांना पूर्ण करायला खूप लोक चुकतात. परंतु, स्वप्नांना पूर्ण केले जाऊ शकतं. आपण आपल्या उत्पन्नाच्या वेळेनुसार आर्थिक योजना आखत असल्यास स्वप्नांना खरे करता येऊ शकते.      

उत्पन्नानुसार बजेट बनवा 
फाइनॅन्शियल प्लॅनिंगमध्ये सर्वात महत्वपूर्ण टीप आहे की, उत्पन्न सुरू झाल्याबरोबर आपण आपला बजेट बनवून घ्या. तुमच्याकडे काय येतंय आणि काय जातंय, ते लिहून ठेवा. खर्चानंतर काय सेव्हिग्ज होत आहेत, याची देखील नोंद ठेवास त्यानंतर गुंतवणुकीची योजना करा. 

या गुंतवणुकीच्या आधी आपण आपल्या बजेटमध्ये अचानक येणाऱ्या खर्चासाठी  पैसे कुठून आणणार, याची देखील तजवीज करणे आवश्यक आहे. 

अचानक लागणारा खर्च
भविष्यामध्ये होणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित खर्च भागवण्यासाठी तुम्ही एमरजन्सी फंड बनवला आहे का? कारण साधारणपणे लोक वैयक्तिक फायनान्सचे सगळे नियम पाळतात, परंतू याला विसरुन जातात. 

एमरजन्सी फंडच्याशिवायही गुंतवणूक करत जातात आणि जेव्हा आपातकालीन स्थिती तयार होते, तेव्हा गुंतवणूक केलेली रक्कम काढून घेतात. असं करणे चुकीचे आहे, यासाठी भविष्यामध्येच होणाऱ्या काही अनपेक्षित खर्चासाठी स्वतंत्रपणे पुरेसा पैसा आवश्यक आहे.

विमा
विमा तुमच्या कुटुंबियांच्या लोकांना अपघात किंवा कोणत्या अनपेक्षित परिस्थितीत नुकसान झाल्यास आर्थिक आधार देण्यासाठी असतो. तुम्ही तुमच्या विम्याचं गरजेच मूल्यांकन करा आणि त्याच प्रमाणे योग्य विमा तयार करा. तुम्ही टर्म पॉलीसी घेतल्यास, तुम्हाला ते विमा सर्वात स्वस्त पर्याय असेल.   

आरोग्याची काळजी
आजच्या काळात एका चांगल्या रुग्णालयात एका छोट्याशा आजारावर उपचार करणे, हे देखील तुमच्या आर्थिक स्थितीला धक्कादायक आहे. कारण, उपचार खर्च पूर्वीच्या तुलनेत खूप महाग झाले आहेत. आणि त्यात दर-दिवशी वाढ होत राहते. 

कुटूंबातील एक सदस्य जरी आजारी पडला.  तरी कधी कधी पूर्ण आर्थिक उत्पन खर्च करण्याची वेळ येते. त्यामुळे आज ज्या शहरात राहतात, त्याच्या आधारावर पुरेसा हेल्‍थ केयर इन्शुरन्स घ्या.    

गुंतवणूक
तुमच्या भविष्याचे आर्थिक ध्येय पूर्ण करण्यामध्ये गुंतवणुकीची भूमिका महत्वपूर्ण असते. दीर्घ कालावधीनंतर गुंतवणुकीत मोठे ध्येय साध्य करण्यास मदत होते. त्याच बरोबर तुमच्या पुढच्या पिढीला देखील याचा फायदा होतो. तरी, अनेक लोक दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतात आणि मध्येच पैसा काढून घेतात. तुम्ही अस करु नका. जोपर्यंत लक्ष पूर्ण नाही तोपर्यंत दीर्घकाळ गुंतवणुकीला धक्का लावू नका.

कर्ज
सहसा युवा पीढी आपली जीवनशैली सुधारण्यात आणि त्यात बदल करण्याच्या नादात, जेवढे कमवतात, त्यापेक्षा जास्त उधार घेवून ठेवतात. या पासून वाचले पाहिजे. जर तुम्ही लोन घेतलंय तर सगळ्यात आधी त्याच्या परतफेडीकडे लक्ष द्या. कधीही जेवढं कमवतो, त्यापेक्षा जास्त कर्ज काढू नका, कर्जफेडण्याची क्षमता ओलांडून कर्ज घेवू नका.  

मृत्युपत्र तयार करा
तुमचे आर्थिक लक्ष तेव्हा पूर्ण होईल, जेव्हा तुम्ही कमावलेली संपत्ती योग्य वारसदाराकडे जाईल. जर तुम्ही तुमच्या संपत्तीचा वारसदार कोण असेल, कोणती प्रॉपर्टी कुणाकडे असेल, हे ठरवा आणि त्याला कायदेशीर स्वरूप द्या, म्हणजे वारसदारांमध्ये योग्य वाटणी होईल.

टॅक्सची नियोजन करा..
प्रत्येक वर्षाच्या सुरूवातीला तुम्ही इनकम टॅक्‍सचं नियोजन करता का? करत नसाल तर सुरू करा आणि यामध्ये काही रक्कम पण टाका. यामुळे शेवटच्या क्षणी तुमची चूक होणार नाही आणि तुमच्यावर आर्थिक बोझा पडणार नाही.   

आर्थिक योजनेची प्रतिक्षा करा 
एकदा आपण आपली आर्थिक योजना अंमलात आणल्यानंतर, त्याचे पोर्टफोलिओच्या कामगिरीवर लक्ष ठेवा. खंर तर, बहुतेक लोक त्यांच्या योजनांवर लक्ष न देऊन चुका करतात, या चुकीची शिक्षा त्यांना भोगावी लागते. 

जर आपण कोठेही गुंतवणूक केली असेल आणि ती आपल्या उद्दिष्टांनुसार परतावा देत नसेल, तर आपण त्याचे मूल्यांकन करुन, इतर गुंतवणूक माध्यमामध्ये गुंतवणूक करावी. मूल्यांकन आणि आर्थिक नियोजन आपल्याला अधिक सुटसुटीत आणि फायदेशीर मार्गाला घेऊन जातात. 

स्वत:हून आर्थिक योजना आखा
आपली आर्थिक योजना यशस्वी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बाजारात पैसा कसा उभा करता येतो, त्याचा अभ्यास करा. जर तुम्ही शिकलात तर तुम्ही ताबडतोब निर्णय घेऊ शकाल. 

तसेच, सामान्य गुंतवणूक करणाऱ्या सामान्य चुका करणे टाळा. आणखी एक गोष्ट अशी आहे की, आर्थिक नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी दोन गोष्टी आहेत. योजना अंमलबजावणी करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर आपल्याला पैशांचा बाजार समजला, तर आपण आपल्या आर्थिक योजनेची अंमलबजावणी करण्यास अधिक सक्षम होतो.