मनेसतून फुटलेल्या ६ नगरसेवकांच्या भवितव्याचा फैसला झाला

मनसेतून फुटलेल्या मुंबई महापालिकेच्या सहा नगरसेवकांच्या भवितव्याचा फैसला अखेर झाला आहे.

Updated: Jan 25, 2018, 10:45 PM IST
मनेसतून फुटलेल्या ६ नगरसेवकांच्या भवितव्याचा फैसला झाला  title=

मुंबई : मनसेतून फुटलेल्या मुंबई महापालिकेच्या सहा नगरसेवकांच्या भवितव्याचा फैसला अखेर झाला आहे. मनेसतून फुटलेले ते ६ नगरसेवक आता शिवसेनेचेच असल्याची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका सभागृहात केली आहे. कोकण आयुक्तांनी शिवसेनेच्या बाजुनं निर्णय दिल्याचं महापौरांनी सभागृहात सांगितलं. 

मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेचे झाल्यामुळे आता शिवसेनेचं संख्याबळ ९३वर गेलं आहे. शिवसेनेचे स्वत:चे ८४, ३ अपक्ष आणि मनसेतून आलेले ६ नगरसेवक शिवसेनेच्या बाजूचे झाले आहेत.

मनसेतून शिवसेनेत गेलेले ६ नगरसेवक

हर्षल मोरे (वॉर्ड नंबर १८९)

परमेश्वर कदम (वॉर्ड नंबर १३३)

दिलीप लांडे (वॉर्ड नंबर १८९)

दत्ताराम नरवणकर (वॉर्ड नंबर १९७)

अश्विनी मतेकर (वॉर्ड नंबर १५६)

अर्चना भालेराव (वॉर्ड नंबर १२६)