मध्य-पश्चिम रेल्वेचा २६ ते २९ जानेवारीपर्यंत ब्लॉक

ब्लॉक दरम्यान उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 25, 2018, 09:24 PM IST
मध्य-पश्चिम रेल्वेचा २६ ते २९ जानेवारीपर्यंत ब्लॉक title=

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड स्थानकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाचे काम भारतीय लष्करामार्फत करण्यात येत आहे. या पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शनिवारी रात्री पासून रविवार पर्यत मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर तर पश्चिम रेल्वे मार्गावर २६ जानेवारी पासून ते २९ जानेवारीपर्यत ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

ब्लॉक दरम्यान उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

परेल स्थानकात डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार

मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री परेल स्थानकात डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. रात्री १२.५० ते सकाळी ६.२० वाजेपर्यत ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर अप धिम्या मार्गावर रात्री १.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यत ब्लॉक असणार आहे.

या गाड्या चिंचपोकळी, करी रोड या स्थानकात थांबणार नाहीत

ब्लॉक दरम्यान सीएसएमटीहून डाउन धिम्या मार्गावर सुटणाऱ्या लोकल गाड्या भायखला ते माटुंगा स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहेत.परेल स्थानकात या गाड्यांना दोन वेळा थांबा देण्यात येणार आहे. या गाड्या चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकात थांबणार नाहीत.

हे अपडेट अवश्य वाचा

सीएसएमटी-कसारा प.४.१५वा,सीएसएमटी-खोपोली प.४.२४वा,सीएसएमटी-कर्जत प.४.४८वा,सीएसएमटी-कसारा प.५वा,सीएसएमटी-आसनगाव प.५.१२वा,सीएसएमटी-कर्जत प.५.२०वा,सीएसएमटी-टिटवाळा प.५.२८वा.सीएसएमटी-अंबरनाथ प.५.४०वा,सीएसएमटी-टिटवाळा प.५.५२वा,सीएसएमटी-आसनगाव स.६.०वा या डाउन धिम्या मार्गावरील गाड्या डाउन जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.

५ वाजेपर्यत धिम्या आणि जलद मार्गावर ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या रात्री १२ ते शनिवारी पहाटे ५ वाजेपर्यत धिम्या आणि जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. तर शनिवारी रात्री १.३० ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यत सर्वच मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलासाठी मरे-परेचा ब्लॉक

ब्लॉक दरम्यान  २६ जानेवारी रोजी रात्री ११.५२ ते सकाळी ६.४८ वाजेपर्यत चर्चगेट स्थानकातून डाउन दिशेला सुटणाऱ्या सर्व लोकल गाड्या आणि अप मार्गावर बोरीवली स्थानकातून रात्री ११.१५ ते १२.१८ आणि अंधेरी स्थानकातून सुटणाऱ्या लोकल गाड्या पहाटे ४.०४ वाजेपर्यत रद्द करण्यात आलेल्या आहेत.

उद्या चर्चगेट स्थानकातून रात्री ११.४०,११.४४,११.५८,रा.१२.२० आणि १२.५० ला सुटणाऱ्या लोकल गाड्या चर्चगेट ते बांद्रा स्थानकादरम्यान रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर अप दिशेला रात्री १० नंतर चर्चगेटसाठी विरार स्थानकातुन चालविण्यात येणाऱ्या लोकल गाड्या बांद्रा ते चर्चगेट दरम्यान रद्द करण्यात आलेल्या आहेत.