महाआरतीनंतर राज ठाकरे उद्या पुण्यात काय करणार?

मनसेप्रमुखांनी पुढील कार्यक्रम ठरवला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) या महाआरतीनंतर  काय करणार आहेत, याची माहिती समोर आली आहे.  

Updated: Apr 16, 2022, 10:24 PM IST
महाआरतीनंतर राज ठाकरे उद्या पुण्यात काय करणार? title=

पुणे : राज्यासह देशाभरात मोठ्या उत्साहात हनुमान जंयती (Hanuman Jayanti) साजरी करण्यात आली. देशाच्या कानाकोपऱ्यात जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Mns Raj Thackeray) यांनीही पुण्यातील खालकर चौकातील हनुमान मंदिरात महाआरती केली. यानंतर आता राज ठाकरेंनी पुढील कार्यक्रम ठरवला आहे. या महाआरतीनंतर राज ठाकरे काय करणार आहेत, याची माहिती समोर आली आहे. (mns chief raj thackeray will be addresing to press confrence on 17 april at pune after mahaarti)

राज ठाकरे हे उद्या पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत. उद्या दुपारी 12 वाजता पुण्यातील पी वाय सी कल्ब, भांडारकर रोड इथे ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. राज ठाकरे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे या महाआरतीनंतर राज ठाकरे उद्या पत्रकार परिषदेत काय बोलणार, कोणावर निशाणा साधणार, याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून राहिलं आहे.