'त्या' आमदारांना मुंबईत भाड्याच्या घरासाठी पैसे मिळणार

धोकादायक झालेल्या मनोरा आमदार निवासामधील आमदारांना आता मुंबईत भाड्याने राहण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत.

Updated: Oct 25, 2017, 07:07 PM IST
'त्या' आमदारांना मुंबईत भाड्याच्या घरासाठी पैसे मिळणार  title=

मुंबई : धोकादायक झालेल्या मनोरा आमदार निवासामधील आमदारांना आता मुंबईत भाड्याने राहण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत. विविध समस्यांमुळे राहण्यास धोकादायक झालेले मनोरा आमदार निवास नोव्हेंबरपर्यंत रिकामे करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी घाटकोपर-चेंबुर मार्गावर पर्यायी तात्पुरत्या सदनिका देण्याचा निर्णय झाला होता. मात्र मंत्रालय तसेच रेल्वे स्टेशनपासून एवढ्या लांब रहायला जाण्यास बहुतांश आमदारांनी असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे मनोरा आमदार निवासाचे काम पूर्ण होईपर्यंत मुंबईत भाड्याने रहाण्यासाठी 50 हजारांपासून एक लाखापर्यंत पैसे दिले जाणार आहेत.