मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचं सरकार सत्तेवर आलं. शिवसेनेतील 40 आमदार शिंदे गटात सहभागी झाले. यापैकीच एक आमदार म्हणजे प्रकाश सुर्वे.
मागठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आता आमदार सुर्वेंच्या कर्मभूमीत त्यांचं उद्या म्हणजे बुधवारी संध्याकाळी 5 वाजता जोरदार स्वागत होणार आहे. यानिमित्ताने मागठाण्यात शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे यावेळी या शक्तिप्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
प्रकाश सुर्वेंचे समर्थक, स्थानिक नागरिक आणि चाहते उद्या संध्याकाळी संजय गांधी नॅशनल पार्क ते हॉटेल गोकुळ आनंद अशी रॅली काढणार आहेत. यावेळी सुर्वे समर्थक जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा आहे.
ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत दहा हजार समर्थक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता गुलाल उधळत, फुलांचा वर्षाव आमदार प्रकाश सुर्वेंच स्वागत केलं जाणार आहे.