सर्वसामान्यांचं सोडा इथे आमदारांच्या वस्तूंचीही चोरी; धावत्या एक्स्प्रेसमधून लाखोंचा ऐवज लंपास

प्रवासामध्ये अनेक प्रवाशांना चोरीचा फटका बसत असतो. असा फटका अपक्ष आमदाराला रेल्वे प्रवासात बसला आहे. 

Updated: Jun 17, 2022, 02:57 PM IST
सर्वसामान्यांचं सोडा इथे आमदारांच्या वस्तूंचीही चोरी; धावत्या एक्स्प्रेसमधून लाखोंचा ऐवज लंपास title=

मुंबई : प्रवासामध्ये अनेक प्रवाशांना चोरीचा फटका बसत असतो. असा फटका अपक्ष आमदाराला रेल्वे प्रवासात बसला आहे. सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर दररोज धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेस मधून अपक्ष आमदार किशोर जोरगेवार सोलापूर हुन मुंबईला येत होते सिद्धेश्वर ट्रेन मध्ये  प्रवास करत होते. विशेष म्हणजे वातानुकूलित प्रथम दर्जा यात आमदार महोदय यांचा प्रवास असताना देखील आमदारांचे 2 अतिशय महागडे असे मोबाईल चोरीला गेले आहे. 

सोलापूर वरून रात्री प्रवास सुरू असताना वातानुकूलित प्रथम वर्ग यात कोचमध्ये आमदार प्रवास करत असताना इतक्या व्हीआयपी डब्यात सुद्धा मोबाईल चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे सर्वसामान्य लोक रेल्वे एसटीचा प्रवास करताना अनेक पाकीट मार किंवा वस्तू चोरीला जातात त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो तरीदेखील प्रशासन सुधारत नाही.

आता तर थेट आमदारांच्या मोबाईलवर डल्ला मारल्याने रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे संबंधित आमदार यांनी रेल्वे प्रशासनाकडे सुद्धा याबाबत तक्रारी केल्या असून अशा स्वरूपाच्या घटना पुढे होऊ नयेत याची खबरदारी घ्यायची सूचना केल्या आहेत तसेच चोरीला गेलेल्या मोबाईलचा देखील तपास करावा असे सांगितले आहे.

रेल्वे प्रवास वेगवेगळ्या सेवा सुविधा दिल्या जात असताना थेट आमदारांचा महागडे मोबाईल वस्तू चोरीला जात असतील तर सर्वसामान्य जनरल डब्यात मध्ये काय परिस्थिती असेल असा सवाल आता उपस्थित होत आहे.