मातोश्रीच्या बाहेर इमोशनल राडा, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

मातोश्रीबाहेरच्या इमोशनल राड्याची ही बातमी आहे. करमाळ्यात राष्ट्रवादीमधून आलेल्या रश्मी बागल यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं शिवसेना आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. 

Updated: Oct 2, 2019, 04:02 PM IST
मातोश्रीच्या बाहेर इमोशनल राडा, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर title=

मुंबई : मातोश्रीबाहेरच्या इमोशनल राड्याची ही बातमी आहे. करमाळ्यात राष्ट्रवादीमधून आलेल्या रश्मी बागल यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं शिवसेना आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. 

मातोश्रीबाहेरच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. तानाजी सावंत यांच्यामुळंच तिकीट न मिळाल्याची शिवसैनिकांची भावना आहे. यावेळी 
तानाजी सावंतांवर जोरदार टीका शिवसैनिकांनी केली. 

करमाळ्यात शिवसेनेनं विद्यमान आमदार नारायण पाटील यांना डावलून राष्ट्रवादी मधून आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यताय. 

आमदार नारायण पाटील बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. दुपारी तीन वाजता नारायण पाटील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निर्णय घेणार आहेत.