MHADA Konkan Division Houses Lottery : वाढती महागाई तरी इथे प्रत्येकाच स्वप्न असतं की आपलं हक्काचं घर असावं. वर्षांनुवर्ष भाड्याच्या घरात राहायला इथे कोणालाही परवडत नाही किंवा आवडतही नाही. नवरा बायको दोघांचीही चांगली नोकरी आणि करिअरमध्ये यशाची पायरी तरीदेखली गगनचुंबी इमारतीमध्ये घर घेणे हे प्रत्येकाला शक्य नसतं. अशात सरकार तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडको (Cidco) या हाऊसिंग संस्थांची स्थापना केली आहे. या संस्थेतून सर्वसामान्य लोकांना त्यांच हक्काच आणि सुरक्षित असं छत मिळावं म्हणून गृहसंकुलं शहरा शहरामध्ये उभ्या केल्या आहेत.
म्हाडा कोकण मंडळाच्या 5311 घरांची सोडत गेल्या काही दिवसांपासून रखडली होती. या घरांसाठी जवळपास 24 हजारांहून अधिक लोकांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्ज केला आहे. गेल्या किती महिन्यापासून हे घराचं स्वप्न कधी पूर्ण होणार याच्या प्रतीक्षेत ते होते. यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. (mhada lottery 2024 konkan division houses lottery to be announced on 24 February In Thane by Chief Minister Eknath Shinde)
आता सर्वसामान्य नागरिक तसंच कोकणवासीयांच्या घराचं स्वप्न साक्षात उतरणार आहे. म्हाडा कोकण गृहनिर्माण मंडळाच्या 5311 घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ही सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. गेल्या तीन वेळा तारीख घोषित करुन ही सोडत रखडलेली होती. कुठल्या ना कुठल्या कारणाने ही सोडत पुढे ढकलल्या जात होती. मात्र आता कोकणातील तब्बल 5 हजार 311 घरांसाठी 24 फेब्रुवारी 2024 ला सोडत ठाण्यात काढण्यात येणार आहे.